जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचा आदेश । सर्वसामान्यांना दिलासा
अहमदनगर । वीरभूमी - 15-Apr, 2020, 12:00 AM
खाजगी वाहनांना पेट्रोल-डिझेल न देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी आज मागे घेतला असून उद्या दि. 16 पासून सर्व वाहनांना सकाळी 5 ते 9 या वेळेत पेट्रोल तर सकाळी 5 ते दुपारी 12 वाजेपर्यंत डिझेल देण्यात येणार असल्याचे पत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाने काढले आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात व देशात लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. वाढीव लॉकडाऊनच्या दि. 14 रोजी काढण्यात आलेल्या आदेशात जिल्हाधिकारी दि. 15 पासून अहमदनगर जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर खाजगी वाहनांना पेट्रोल मिळणार नसल्याचे जाहीर केले होते. या निर्णयामुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही पेट्रोल-डिझेल दिले नाही. यामुळे दूध उत्पादक, शेतकरी, सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. अनेकांनी पेट्रोल-डिझेल नसल्यास अनेक अडचणीचा सामना करावा लागेल, याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
भारी काम केल पेट्रोल चालू करुन धन्यवाद साहेब