पशुवैद्यक संघटनेचा सामाजिक उपक्रम कौतुकास्पद : प्रांताधिकारी अर्चना नष्टे
कर्जत । वीरभूमी - 30-Apr, 2020, 12:00 AM
कर्जत तालुका पशुवैद्यक संघटना यांच्यावतीने कोरोना मुख्यमंत्री साह्यता निधीस तब्बल ७४ हजार २२४ रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली असून त्याचा धनादेश कर्जतच्या प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्याकडे गुरुवारी सुपूर्द करण्यात आला.
देशात आणि राज्यात सध्या सर्वत्र कोरोना रोगाने मोठे थैमान घातले असून या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि संचारबंदी घोषित करण्यात आली. दिवसादिवस कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या वाढत आहे. लॉकडाऊन काळात सर्व व्यवहार आणि बाजारपेठा बंद असल्याने सरकारी तिजोरीवर मोठा ताण पडला आहे. यासाठी कोरोना मदतीसाठी पंतप्रधान मदतनिधी आणि मुख्यमंत्री मदतनिधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अनेक दानशूर व्यक्ती या आणीबाणीच्या काळात पुढे येत मदत देत आहे. याच धर्तीवर कर्जत तालुका पशुवैद्यक संघटनेच्या पदाधिकारी आणि सदस्यानी एकत्र येत मुख्यमंत्री साह्यता निधीसाठी तब्बल ७४ हजार २२४ रुपयांची मदतनिधी जमा करत त्याचा धनादेश गुरुवारी कर्जतच्या प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्याकडे संघटनेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत लोंढे, डॉ. वसंत नांदे, नगरसेवक डॉ. संदीप बरबडे यांनी गुरुवारी सोशल डिस्टिंगचे अटी व नियम पाळत सुपूर्द केला. यावेळी डॉ अफरोजखान पठाण, डॉ. घनश्याम सौताडे, डॉ. रमेश मांडगे, डॉ. विलास राऊत उपस्थित होते.
Stay home. Stay safe