अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनास सहकार्य करा : मुख्याधिकारी प्रशांत सरोदे.
कोपरगाव । वीरभूमी - 28-May, 2020, 12:00 AM
देशासह राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. अहमदनगर जिल्हा हा नॉन रेड झोन मध्ये असल्यामुळे प्रशासनाच्या वतीने टाळे बंदी शिथिल करण्यात आली. कोपरगाव शहरात प्रशासनाकडून काहीं नियम अटी ठरवून सकाळी ९ ते ५ या वेळेत व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली. राज्यात कोरोणा रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे लॉकडाऊन विषयी नागरिकांमध्ये समाज माध्यमातून अफवा पसरविल्या जात आहे. त्याचप्रमाणे १ जून पासून कोपरगाव शहरात टाळेबंदीची अफवा पसरविण्यात आली होती.
या संदर्भात मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनास सहकार्य करावे, प्रशासनाकडून काहीं आदेश आल्यास नागरिकांना कळविण्यात येतील. असे आवाहन मुख्यधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले.
Imp information.