पत्रकारांना विशेष पॅकेज मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून पाठपुरावा
नगर दक्षिण जिल्ह्याच्या पदाधिकार्यांशी विश्वास आरोटे यांची ऑनलाईन चर्चा
अहमदनगर । वीरभूमी - 11-Jun, 2020, 12:00 AM
राज्यातील पत्रकारांनी कोरोनाच्या काळात भक्कमपणे काम केले आहे, त्यामुळे पत्रकारांना इतरांप्रमाणेच पन्नास लाखाचे विमा कवच मिळवून दिले आहे. कोरोना काळात पत्रकारांची आर्थिक आवस्था गंभीर झाली असल्याने आर्थिक पॅकेज मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, संघटक संजय भोकरे साहेब व अन्य पदाधिकाऱी पाठपुरावा करत आहेत असे राज्य संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी सांगितले. पत्रकारांना इतरांप्रमाणेच पन्नास लाखाचे विमा कवच मिळवून दिले त्याबद्दल मुंडे, भोकरे यांचे बैठकीत अभिनंदन करण्यात आले.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, संघटक संजय भोकरे साहेब यांच्या आदेशाने नगर दक्षिण जिल्हा पदाधिकार्यांशी राज्य सरचिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन चर्चा झाली. प्रारंभी संघाचे मुंबई मंत्रालय मुख्य संपर्क प्रमुख नितीन जाधव यांनी प्रास्तावीक केले. राज्य प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव यांनी करत आपली भूमिका मांडली. त्यानंतर नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते यांनी संघाने पत्रकार व समाजासाठी कोरोना संकटाच्या काळात केलेल्या कामाची माहिती दिली.
नगर जिल्हा कार्याध्यक्ष सूर्यकांत नेटके यांनी कोरोना काळात पत्रकारांनाही इतराप्रमाणे पन्नास लाखाचे विमा कवच मिळवून दिले त्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, संघटक संजय भोकरे साहेब, राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांचे अभिनंदन करण्याचा ठराव मांडला. त्याला दत्ता पाचपुते यांनी अनुमोदन दिले. कोरोनाच्या काळात पत्रकारीता क्षेत्रात काम करत असलेल्या कर्मचार्यांची आर्थिक अवस्था गंभीर झाली आहे. मात्र अशा परिस्थितीतही पत्रकार जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यामुळे कोरोनात काम करणार्या पत्रकारांना इतर कर्मचार्यांप्रमाणे सरकारकडून आर्थिक पॅकेज मिळावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले असून पँकेज मिळवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, संघटक संजय भोकरे साहेब यांचेमार्फत पाठपुरावा केला जात आहे असे विश्वास आरोटे यांनी सांगितले.
पत्रकारांना बँका कर्ज देत नाहीत. मात्र आता शहरी व ग्रामीण पत्रकारांना लघुउद्योग, पुरक उद्योग करण्यासाठी विशेष पॅकेज म्हणून कर्ज उपलब्ध करुन द्यावे, यासाठीही संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व पदाधिकारी प्रयत्न करणार असल्याची माहिती विश्वास आरोटे यांनी दिली. राज्य पत्रकार संघाने बँक उभारून त्यामाध्यमातून पत्रकारांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे, पत्रकार संरक्षण कायदा प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढाकार घ्यावा आणि गरजेनुसार पत्रकारांना तातडीने शस्त्रपरवाना मिळावा यासाठी पाठपुरावा करावा, असे राज्य कार्यकारीनी सदस्य निलकंठ कराड यांनी सांगितले.
तालुका व जिल्हा पातळीवरील राहिलेल्या तालुका पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांना पत्रकारांविषयी अस्था आहे, त्यामुळे ते पत्रकारांना न्याय देतील. कर्जत-जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनीही पत्रकारांबाबत लक्ष घालून भूमिका घ्यावी यासाठी संघाचे पदाधिकारी काम करत असल्याचे आरोटे यांनी सांगितले.
चर्चेत विश्वास आरोटे, नवनाथ जाधव, नितीन जाधव, सूर्यकांत नेटके, दीपक कांबळे, सचिन चोभे, दत्ता पाचपुते, राज्य कार्यकारीणी सदस्य निलकंठ कराड, सचिन सातपुते (शेवगाव), तुळशीदास मुखेकर (पाथर्डी), ओंकाळ दळवी (जामखेड) आदीसह पदाधिकारी सहभागी झाले होते. नगर शहर जिल्हा कार्यकारीणी लवकरच जाहीर करणार असल्याचे या बैठकीत जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले. मंत्रालय मुख्य संपर्क प्रमुख नितीन जाधव यांनी सुत्रसंचालन केले तर निलकंठ कराड यांनी आभार मानले.
hPrfavWpq