१४ हजार रुपयांची सुगंधी तंबाखू व सपारी जप्त
जामखेड । वीरभूमी - 14-Jun, 2020, 12:00 AM
खर्डा येथील सुर्वे गल्ली व गवंडे गल्ली येथे मावा बनवणाऱ्या दोन ठीकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला. या मध्ये एकुण चौदा हजार रुपयांचे सुगंधी तंबाखू व सपारी सह इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी दोघाजणांनवर जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी विनोद अभिमन्यू गटकळ रा. सुर्वे गल्ली, खर्डा व आयुब मोतीलाल बागवान रा. गवंडी गल्ली, खर्डा अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पो ना. सचिन आदबल ज्ञानेश्वर शिंदे प्रकाश वाघ, फीर्यादी सागर सुलाने यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या आदेशानुसार व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली. खर्डा या ठीकाणी मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू च्या सहाय्याने मावा बनवत आसल्याची माहिती नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला समजली त्या अनुषंगाने रविवार दि १४ रोजी सकाळी १०.१५ च्या सुमारास या पथकाने खर्डा येथील सुर्वे गल्ली व गवंडे गल्ली या ठीकाणी छापा टाकला. यावेळी महाराष्ट्र राज्यात तंबाखू जन्य पदार्थांची विक्री व तयार करण्यास प्रतीबंध आसताना देखील वरील आरोपी हे आपल्या रहात्या घरामध्ये व वाड्याच्या कंपाऊंड मध्ये सुपारीच्या सहाय्याने व हाताच्या मदतीने सुगंधी तंबाखू चा मावा तयार करुन विक्री करत आसल्याचे आढळून आले.
या वेळी आरोपींन कडुन बारीक सुपारी, सुगंधी तंबाखू, प्लास्टिक चे पुडे व एक कीलो तयार मावा आसा एकुण चौदा हजार रुपयांचा माल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जप्त केला आहे. फीर्यादी पो कॉ सागर नारायण सुलाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील दोघाजणांनवर जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Hi, I need your help with a problem I've got. I messed up with a young girl and now she's upset with me. I know I was in the wrong and I want to fix it. Can you help me figure out what to do? I'm willing to pay for your time and expertise. Please call me as soon as you can. My Whatsapp: +353877761357 My phone: +17852122012 My email: anguslevie@gmail.com Thanks, Angus