जिल्ह्यातील आठ कोरोनाग्रस्त आज बरे होऊन घरी परतले । बरे झालेल्यांची संख्या 206
अहमदनगर । वीरभूमी - 15-Jun, 2020, 12:00 AM
पाथर्डी तालुक्यानंतर आता शेवगाव तालुकाही कोरोनामुक्त झाला असून आज जिल्ह्यातील आठ कोरोनाग्रस्त या आजारातून बरे होऊन घरी परतले. आहेत. त्यांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे जिल्ह्यातील बरे होणार्या रुग्णांची संख्या 206 झाली आहे.
आज बरे झालेल्या रुग्णांमध्ये शेवगाव येथील एका रुग्णासह संगमनेर 03, राहाता 02, नगर शहर 01 आणि कोपरगाव 01 समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 206 झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथे पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर शहरटाकळी, शेवगाव शहर व राणेगाव येथे कोरोना बाधित आढळून आले होते. ढोरजळगाव येथील कोरोना बाधित बरा झाल्यानंतर एका पाठोपाठ सर्वच रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे शेवगाव तालुका कोरोनामुक्त झाला आहे.
यापुढे शेवगावकरांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करून व सतर्क राहुन शेवगावला कोरोना पासून दूर ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
रविवारी शेवगाव शहरात एक कोरोना बाधित आढळल्याचा मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल होत होता. मात्र त्या संशयिताचा अहवाल हा पॉझिटिव्ह नसून निगेटिव्ह आला आहे. यामुळे नागरिकांनीही अफवांवर विश्वास न ठेवता जागृक रहावे असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
aXqVOHwCrAcMT