तहसीलदार योगेश चंद्रे यांनी भेट देवून पूरस्थितीची केली पहाणी
कोपरगाव । वीरभूमी - 15-Jun, 2020, 12:00 AM
वरील भागात जोरदार पाऊस झाल्याने कोपरगाव-येवला तालुक्याच्या सीमेवर असलेल्या ओगदी येथील मातीचा मोठा बंधारा ओसंडून वाहू लागला आहे. पहिल्याच पावसाने भरला आहे. पाण्याचा अचानक पाण्याचा लोंढा येवून बंधारा पूर्णपणे भरून ओसंडून वाहु लागल्याने गावकरी अचंबित झाले आहेत.
कोपरगाव तालुक्यातील ओगदी हे गाव येवला - कोपरगाव सीमेवरील गाव आहे. सोमवारी सायंकाळी येवला तालुक्यातील उंदिरवाडी येथे सुमारे एक तास झालेल्या मुसळधार पावसाने एकदम पाण्याचा लोंढा ओगदी गावाकडे आल्याने ओगदीचा बंधारा पूर्ण भरला असून ओसंडून वाहत आहे. या घटनेने गावकरी अचंबित झाले आहे.
येवला तालुक्यातील उंदिरवाडी शिवारात ढगफुटी झाल्याची माहिती शेतकरी रवींद्र पोळ यांनी दिली आहे. तसेच कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथेही सुमारे तीन तास मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती कळताच कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी भेट देवून प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्यासमवेत सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
GVCQPWzOyRDpNZH