नुकसान झालेल्या शेतकर्याना नुकसान भरपाई देण्याची केली मागणी
अहमदनगर । वीरभूमी - 22-Jun, 2020, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील अनेकक भागात बाजरी, सोयाबीन व अन्य पिकांच्या बियाणांची उगवण झाली नसल्याने दुबार पेरणीचे अनेक संकट आले आहे. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी करुन बियाणे उत्पादक कंपन्या तसेच त्यांना पाठिशी घालणाऱया कृषी विभागाच्या अधिकाऱयांवर कारवाई करावी. तसेच नुकसान झालेल्या शेतकऱयांना सबंधित कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी केली आहे.
संभाजी दहातोंडे पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री व कृषी आयुक्त यांना ईमेल पाटवून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी सर्वत्र समाधान कारण पाऊस झालेला असल्यामुळे खरिपाच्या पेरण्या सुरु झाल्या आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱयांनी बाजरी, सोयाबीन, मुग, उडीदाची पेरणी केली आहे. मात्र अहमदनगरसह राज्यातील अनेक भागात बाजरी, सोयाबीन व अन्य पिकांची उगवण झाली नाही. काही ठिकाणी पन्नास टक्क्यापेक्षा अधिक प्रमाणात बियाणे खराब निघाले. विविध बियाणे उत्पादक कंपन्यांनी निकृष्ट दर्जाच्या बियाणाचा पुरवठा केल्यामुळेच बियाणे उगवले नाही.
कोरोना सारख्या गंभीर संकटाशी सरकार आणि जनता सामना करत आहेत. या संकटामुळे शेतकरीही अडचणीत आहे. मात्र अडचणीवर मात करत खरिपाची पेरणी करण्याचा प्रयत्न केला असता बियाणे खराब निघाल्यामुळे पुन्हा दुबार पेरणीचे संकट आले आहे. बियाणे उगवण झाली नसल्याबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱयांकडे तक्रारी दाखल झालेल्या आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी निकृष्ट बियाणे विक्री करणाऱयांवर व उत्पादक कंपनीवर काहीही कारवाई करताना दिसत नाही. याआधीही अहमदनगर मध्ये एका दुकानदाराकडे कोट्यावधी रुपयाचे मुदतबाह्य किटकनाशके सापडली होती. नेवासा तालुक्यात काही शेतकऱयांना खराब बियाणे दिल्याने नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र त्याबाबत कारवाई करण्याएवजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांनी सबंधित दुकानदाराला पाठिशी घालून प्रकरण मॅनेज केले.
आता खराब बियाणामुळे दुबार पेरणी करण्याचे अनेक शेतकऱयावर संकट आले आहे. तरीही कृषी विभागाने अजून गांभिर्याने घेतले नाही. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर चौकशी करुन बियाणे उत्पादक कंपन्या तसेच त्यांना पाठिशी घालणाऱया कृषी विभागाच्या अधिकाऱयांवर कारवाई करावी व नुकसान झालेल्या शेतकऱयांना नुकसान भरपाई द्यावी.
KnHLfYDr