पारनेर तालुक्यात पुन्हा आढळले ४ कोरोना पाॅझिटिव्ह
पारनेर । किरण थोरात - 08-Jul, 2020, 09:22 PM
पारनेर तालुक्यातील हंगा गावामध्ये १ रुग्ण आढळला आहे. तसेच सावरगावमध्ये २ रुग्ण व कर्जुले हर्या या गावामध्ये १ रुग्ण असे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.
हंगा, सावरगाव, कर्जुले हर्या ही गावे तातडीने बंद करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे मॅडम यांनी दिले आहे. पारनेर तालुक्यात चार दिवसात कोरोना रुग्णांची संख्या २१ च्या घरात जाऊन पोचली आहे.
पारनेर तालुक्याचे संकट दिवसेंदिवस वाढतच आहे. तरी सर्वांनी आपली काळजी घेणे गरजेचे आहे व प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे.
BOuZJIPKbCykNT