कासार पिंपळगाव येथे शिवजयंती उत्साहात
कासार पिंपळगाव येथे शिवजयंती उत्साहात
जय भवानी, जय शिवाजी,’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ अशा विविध घोषणांच्या दणदणाटात कासार पिंपळगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने रस्त्यांवर, चौकाचौकात पताके लावण्यात आले होते. या मिरवणुकीचे खास वैशिष्ट्य म्हणजे, न्यू इंग्लिश स्कूल मधील शालेय विद्यार्थ्यांनी शिवजयंती उत्सवानिमित्त बाल शिवाजीची घोड्यावरुन ढोल, ताशा, झांज पथकाच्या सवाद्यामध्ये गावातून मिरवणूक काढली. न्यू इंग्लिश स्कुल व श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनींची पारंपरिक वेषभूषा, लेझीम पथक, हाती भगवे झेंडे आणि शाही मिरवणूक काढून ‘जय भवानी...जय शिवाजी...’च्या गजरात शिवजयंती साजरी करण्यात आली. या मिरवणुकीची सुरुवात न्यू इंग्लिश स्कूल आदिनाथनगर येथून करून कासार पिंपळगाव पर्यंत करण्यात आली यावेळी तालुक्याच्या लाडक्या आमदार मा.मोनिकाताई राजीवजी राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त व शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर व शिवव्याख्याते गजानन शिंदे यांच्या व्याख्यानाने शेवट झाला. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने आमदार मोनिकाताई राजळे यांचा वाढदिवसानिमित्त तर कासार पिंपळगाव या गावाला स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाल्याबद्दल कासार पिंपळगाव गावच्या सरपंच मोनाली राजळे यांचा गावकऱ्यांकडून सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार मोनिका राजळे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याच धर्माच्या विरोधात नव्हते उलट ते सर्व धर्मांचा आदर करत होते. आजच्या तरुणांनी त्यांच्या सर्वधर्मसमभावाच्या विचारांचा जागर केल्यास जीवन समृद्ध बनेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व हे प्रत्येकासाठी स्फूर्ती देणारे आहे. कुशल प्रशासक, पराक्रमी योद्धा, आज्ञाशील पुत्र, जाणता राजा अशा अनेक अंगांनी शिवरायांचे व्यक्तिमत्व महत्त्वाचे मानले जाते. एकाच वेळी अनेक बलाढ्य शत्रूंशी लढून रयतेसाठी स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या शिवरायांनी जगाला आदर्श घालून दिला. गडकिल्ल्यांच्या मदतीने आणि निष्ठावंत सहकाऱ्यांच्या साथीने महाराजांनी स्वराज्यनिर्मिती करून न्याय, नीती, स्वातंत्र्य आणि समानतेचा मूलमंत्र जोपासला. ज्याप्रमाणे महारांनी महाराष्ट्रातील आठरा पगड जातीच्या तरूणांना मावळे म्हणुन एकत्र करून महाराष्ट्रामधे रयतेचे राज्य निर्माण केले त्याप्रमाणेच गावच्या विकासासाठी आपआपसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे व ऐक्य वाढवा याने गावाचा निश्चितच विकास होईल असेही त्या म्हणाल्या.
मुरवणुकीत जि.प. सदस्य राहुलदादा राजळे, वसंत भगत, आर.वाय.म्हस्के, सोपानराव तुपे, संभाजीनाना राजळे, द्वारकानाथ म्हस्के ह.भ.प. भाऊपाटील राजळे शामसुंदर राजळे, मुक्ताजी भगत, शिवाजी भगत,संभाजी राजळे,देविदास राजळे,माणिकतात्या राजळे,मुरलीतात्त्या भगत, राधाकीसंन राजळे,संताराम पवार,रामदास शेळके,भीमजी भगत, तुषार तुपे,राजेंद्र तुपे,संभाजी ठ. राजळे,नानासाहेब देशमुख,दामोधर कांबळे गुरुजी, न्यू इंग्लिश स्कूल व श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी यांसह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सामील होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गावच्या सरपंच मोनाली राजळे यांनी, तर सुत्रसंचलन राजीव सुरवसे यांनी केले. या मिरवणुकीचे सर्व नियोजन हे स्व.राजीवजी राजळे मित्र मंडळ व सर्व ग्रामस्थ कासार पिंपळगाव यांच्या वतीने करण्यात आले होते.
xTLRlWeH