मारवाड गल्लीतील 11 जणांचे अहवाल निगेटिव्ह । प्रशासनाच्यावतीने नियमाचे पालन करण्याचे आवाहन
शेवगाव । वीरभूमी - 17-Jul, 2020, 12:00 AM
आज शुक्रवारी शेवगाव शहरात आणखी 03 तर पाथर्डी शहरात आणखी 08 कोरोना बाधितांची भर पडली आहे. शेवगाव शहरातील मारवाडगल्लीतील 11 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पाथर्डी शहरात आज पासून प्रतिबंधित क्षेत्र म्हणुन जाहीर केल्याने दि. 23 जुलै पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता बंद पाळण्यात आला आहे.
शेवगाव शहर व तालुक्यात मागील काही दिवसापासून कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून चिंता व्यक्त केली जात आहे. शेवगाव तालुक्यातील निंबे नांदूर नंतर शहरातील मारवाड गल्ली व गांधी पुतळ्या जवळ कोरोना बाधित आढळल्यानंतर आज पुन्हा नव्याने 03 कोरोना बाधितांची भर पडली आहे.
पाथर्डी तालुक्यात गुरुवारी 42 रुग्ण वाढल्यानंतर पाथर्डी शहर 23 जुलै पर्यंत तर तिसगाव 25 जुलै पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून बंद पाळण्यात येणार आहे. पाथर्डी शहरातील जय भवानी चौकातील 08 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता नियमित मास्कचा वापर करावा, नियमाचे पालन करावे, एकमेकांशी संपर्क टाळावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
Hello