शेवगाव तालुक्यातील वाडगावात आढळला कोरोना बाधित
शेवगाव । वीरभूमी - 19-Jul, 2020, 12:00 AM
तालुक्यातील वाडगाव येथे आज 01 कोरोना बाधित आढळला. ही व्यक्ती तीन-चार दिवसापासून आजारी होती. यामुळे या व्य्कतीचा घशातील स्त्राव घेवून जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल आज पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 41 झाली असून 21 जणांवर उपचार सुरू आहेत तर आतापर्यंत 20 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
थाटे वाडगाव येथील एकजण मुंबई उल्हासनगर येथून काही दिवसापूर्वी आला होता. मात्र त्याच तीन दिवसापूर्वी मृत्यू झाला. यामुळे तालुका प्रशासनाला संशय आल्याने मयत झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील 10 व्यक्तींना तपासणीसाठी ताब्यात घेवून त्यांचे स्त्राव घेण्यात आले होते. यातील एका जणांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत आज 01 ने भर पडली आहे.
आतापर्यंत शेवगाव शहरात 16, शहरटाकळी 02, ढोरजळगाव 01, राणेगाव 02, भाविनिमगाव 01, आखगेगाव 01, भातकुडगाव 01, मुंगी 8, नांदुर विहिरे 7, अधोडी 01 व वाडगाव 01 असे 41 कोरोना बाधित आढळले असून यातील आतापर्यंत 20 जणांना डिस्चार्ज मिळाला असून 21 जणांवर उपचार सुरू आहेत.
ISKjFTBmZuV