पिकांसह, रस्ता, पूल गेले वाहुन
पाथर्डी । वीरभूमी- 31-Jul, 2020, 12:00 AM
आज शुक्रवारी पहाटे 1 वाजता पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी परिसरात ढगफुटी झाल्याने शेतकर्यांचे अतोनात हाल झाले. तसेच अमरापूर-बारामती रस्ता, त्यावरील पूल व पिके वाहुन गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसाने बहरलेली पिके वाया गेली असून या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
गेल्या चार-पाच वर्षापासून दुष्काळी परिस्थितीने हैराण झालेल्या शेतकर्यांना यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने समाधान व्यक्त होत होते. पिकेही चांगली बहरली होती. यावर्षी शेतकरी आनंदी असतांना शुक्रवारी पहाटे 1 वाजता अचानक ढगफुटी झाल्याने होत्याचे नव्हते झाले.
जोरदार पावसाने नदीला आलेल्या पुराने नदीवरील पूल, अमरापूर-बारामती रस्ता व नदीकाठच्या शेतातील पिके वाहुन गेली. यामध्ये कपशी, भूईमुग, बाजरी, कडधान्य आदी पिके वाहुन गेली.
या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
SBeXpVmRudyT