बहिणीचे प्रेम पाहत उपनगराध्यक्ष राऊत झाले भावुक
कर्जत 03-Aug, 2020, 12:00 AM
कर्जत | वीरभूमी दि ३
भाऊ आणि बहिणींचे पवित्र बंधन असणारा सण रक्षाबंधन म्हणजे एक विश्वासाचे नाते असाच एक आगळा वेगळा रक्षाबंधन कर्जत नगरपंचायतमधील महिला कर्मचारी यांनी उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांना राखी बांधून साजरा केला.
कर्जत येथील नगरपंचायतमधील महिला कर्मचारी आणि महिला सफाई कामगार यांनी कर्जत नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी बोलताना महिला कामगार म्हणाल्या की, राऊत हे नेहमी आमच्या कठीण प्रसंगी मदतीला, कुटुंबाच्या सुख-दुःखाला भाऊ म्हणून नेहमी धावून येतात त्यामुळे आम्ही सर्व बहिनी म्हणून आज त्यांना राख्या बांधून हा सण साजरा केला. तर नगरपंचायतच्या महिला कर्मचाऱ्यांचा भाऊ म्हणून आपण काम करताना त्यांना हक्काने कधी रागावुन सांगतो परंतु या सर्वजणी आपल्याला कुणी लहान भाऊ म्हणून तर कुणी मोठा भाऊ समजून घेत आपले कर्तव्य पार पाडतात. आज त्यांनी राख्या बांधल्याने मला त्यांचा भाऊ होण्याचे भाग्य लाभले आहे अशी भावना उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी व्यक्त केली आहे. यावेळी कार्यालीन प्रमुख संतोष समुद्र महिला कर्मचारी मंदा होले, कोमल कदम, नूतन पवार आदि उपस्थित होत्या.
शेवगाव मधील कोणत्या गावात किती सापडले ती माहिती टाकत जा