कार्यालय फोडले । अभियंत्याच्या खुर्चीला चपलांचा हार
पाथर्डी । वीरभूमी - 14-Sep, 2020, 04:50 PM
पाथर्डी शहरातील राष्ट्रीय महामार्ग व मुख्य रस्त्याची झालेली दुरावस्था व नागरीकांना होणारा प्रचंड त्रास या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक होत आज दुपारी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयात तोडफोड करत पालिका कार्यालयात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
पालिका मुख्याधिकारी यांना उपरोधिक भाषेत निवेदन देण्यात आले असुन सदर रस्त्यावर मोठमोठे खड्डे असुन रस्त्याची कामे अतीशय चुकीची व निकृष्ट दर्जाचे असल्याने त्या ठिकाणी तलाव सदृश परीस्थिती असल्याने त्याठिकाणी मासेमारी व पर्यटन व्यवसायास परवानगी देण्यात यावी व कोरोना काळात बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा आशयाची मागणी करत निवेदन देण्यात आले.
शहरातील मुख्य वाहतुक रस्ता व अतिशय दाट वर्दळ असलेल्या आंबेडकर चौक, नाईक चौक, शेवगाव रोड, व राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडल्याने प्रचंड प्रमाणात पाणी साचत असल्याने व कामे अर्धवट असल्याने वाहतुक कोंडी होत आहे. रोज अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत व त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाहनाचा देखभाल खर्च व मनके, पाठदुखी सारखे शारिरीक आजार जडले आहेत. मात्र याकडे प्रशासन डोळेझाक करत असल्याचे निदर्शनास आल्याने मनसेच्यावतीने आक्रमक होत मनसे तालुकाप्रमुख संतोष जिरेसाळ व अविनाश पालवे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग विभाग कार्यालयात निवेदन देण्यास गेले असता त्या ठिकाणी जबाबदार कोणी अधिकारी उपस्थित नव्हते. हे पाहता मनसैनिक आक्रमक झाले व कार्यालयात तोडफोड करत अभियंत्याच्या खुर्चीला चपलांचा हार घालत निषेधाच्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले.
KNQbUHPxXvSD