भविष्यात नगर जिल्ह्यासाठी एस पी म्हणून येण्यासाठी दिल्या शुभेच्छा..
वीरभुमी- प्रतिनिधी 07-Oct, 2020, 12:00 AM
युवकांचे प्रेरणास्थान, पाथर्डी शेवगाव नेवासा या तालुक्यांमध्ये आपल्या कर्तृत्वाची छाप निर्माण करून अनेक गुन्ह्यांचा उलगडा करत अपराध्यांना गजाआड करणारे गुन्हेगारांचे कर्दनकाळ व पोलिस कर्मचाऱ्यांवर वचक ठेवणारे उपविभागीय पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांची बदली झाल्याने शिंगोरी येथील शृंगऋषी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
शेवगांव तालुक्यातील तीन ही तालुक्यात सर्वसामान्याना प्रेम आणि सलोखा देत गुंडगिरीला लगाम लावण्याचे काम केल्याने जनमानसात त्यांची एक वेगळी प्रतीमा तयार झाली होती. आपले कर्तव्य बजावत असताना तालुक्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरूणांच्या स्वप्नाना बळ देत कायम मार्गदर्शन व सहकार्य केले आहे. त्यां
अशा चांगल्या आणि नेहमी समाजासाठी योगदान देणाऱ्या शिंगोरी येथील शृंगऋषी प्रतिष्ठानच्या वतीने, प्रतिष्ठानचे पदाधिकारी अशोक उगलमुगले व सुभाष ऊफळे यांनी त्यांची भेट घेउन सत्कार केला. सत्कार प्रसंगी मंदार जावळे यांचे बदलीमुळे तरून वर्गांना त्यांची कमी कायमच जानवत राहील आसे बोलल्या नंतर त्यांनी सांगितले की आपण फक्त शरीराने दूर असणार आहोत तुम्हाला व तुमचे अभ्यासिकेसाठी कायम सहकार्य राहील. तसेच त्यांना पुढील कारकिर्दीसाठी आणि भविष्यात पुन्हा पोलिस आधिक्षक म्हणून पुन्हा नगर येथे येण्याच्या ही शृंगऋषी प्रतिष्ठानचे वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
Comments