पाथर्डी । वीरभूमी - 08-Oct, 2020, 12:00 AM
गुरुवार दि. 8 ऑक्टोबर रोजी पाथर्डी शहरासह तालुक्यातील 70 तर शेवगाव तालुक्यातील नागलवाडी येथील 1 असे 71 जणांचे अहवाल रॅपिड अँटीजन व खाजगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचणी अहवालातून पॉझिटिव्ह आले आहेत.
तर आज 22 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. महेंद्र बांगर यांनी दिली आहे.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील पाथर्डी 6, साईनाथनगर 1, भगवाननगर 1, अष्टवाडा 1, कसबा पेठ 1, फुलेनगर 2, इंदिरानगर 2, शिक्षक कॉलनी 1, नाथनगर 4, आनंदनगर 1 असे शहरात 20 कोरोना बाधित आढळले.
तर तालुक्यातील चिंचपूर इजदे 4, अकोला 2, भूतेटाकळी 3, कारेगाव 1, शिरसाटवाडी 1, औरंगपूर 2, केळवंडी 2, निवडुंगे 2, तिसगाव 4, शिरापूर 1, कासार पिंपळगाव 6, ढवळेवाडी 1, मिरी 1, टाकळीमानूर 1, कामत शिंगवे 1, माणिकदौंडी 2, मोहोज खुर्द 1, हनुमान टाकळी 4, आल्हनवाडी 1, पारगाव 1, मालेवाडी 2, माळी बाभूळगाव 2, खरवंडी कासार 1, मुंगूसवाडे 1, म्हस्केवाडी 1, निपाणी जळगाव 1, दैत्यनांदूर 1 असे 50 कोरोना बाधित आढळले.
तर शेवगाव तालुक्यातील नागलवाडी येथे 1 असे एकूण 71 कोरोना बाधित आढळले.
नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, घराबाहेर जातांना तोंडाला मास्क लावावा. व सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
Comments