श्रीगोंदा तालुक्यात आज आढळले १५ कोरोना बाधित
श्रीगोंदा । वीरभूमी - 09-Oct, 2020, 12:00 AM
शुक्रवार दि.९ रोजी ९४ रॅपिड अँटीजन चाचण्या व ४७ जणांचे घशातील स्राव घेतले. रॅपिड चाचण्यांत १० जण पॉझिटिव्ह आले.तर नगर येथून आलेल्या घशातील स्रावांच्या अहवालात ५ जण संक्रमित आढळले.
आत्तापर्यंत एकूण रुग्णांची संख्या १९२९ झाली आहे. दि.९ रोजी १७ जण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत १७५९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ३३ जणांचा बळी गेला आहे. सद्यस्थितीला ३८ जण कोविड केंद्रात उपचार घेत आहेत तर खाजगी हॉस्पिटलमध्ये ९९ जण उपचार घेत आहेत.
दि.९ रोजी श्रीगोंदा शहरात ३ जण पॉझिटिव्ह आले. श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील आणखी २ जण कर्मचारी संक्रमित आढळले व पंतनगर येथे १ जण पॉझिटिव्ह आला.
तालुक्याच्या ग्रामीण भागात बेलवंडी बुद्रुक-२, श्रीगोंदा कारखाना-२, कौठा-२, काष्टी-२, चिंभळा-१, वडाळी-१, कोळगाव-१ तर भानगाव येथे १ जण संक्रमित आला. अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.
rxoqWSPKMlzNYC