शेवगाव तालुक्यात आढळले 16 कोरोना बाधित
शेवगाव । वीरभूमी - 10-Oct, 2020, 12:00 AM
शनिवार दि. 10 ऑक्टोबर रोजी शेवगाव शहरासह तालुक्यातील गदेवाडी, देवटाकळी, ढोरजळगाव आरोग्य केंद्रांतर्गत करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजन कोरोना चाचणीत 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर तब्बल 95 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
शनिवारी शेवगाव तालुक्यातील शेवगाव ग्रामीण रुग्णालय (58), ढोरजळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र (25), गदेवाडी प्राथमिक उपकेंद्र (25) व देवटाकळी प्राथमिक उपकेंद्र (3) अशा एकूण 111 जणांची रॅपिड अँटीजन चाचणी करण्यात आली.
यामध्ये 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 95 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेले 16 रुग्ण हे शेवगाव येथील आहेत.
शनिवारी शेवगाव तालुक्यातील 33 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, घराबाहेर जातांना तोंडाला मास्क लावावा. सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, तसेच लक्षणे आढळल्यास तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
uDQbqFwCxZ