पिकात पाणी, शेतकरी आर्थिक संकटात.
बोधेगाव- वीरभुमी 12-Oct, 2020, 12:00 AM
सौभाग्याचं लेन गहाण ठेवून काळ्या आईची कुस उजवली पिक देखील जोमात आलं परंतु हातातोंडाशी आलेला घास सलग पाच तास पडत आसलेल्या मुसळधार पावसाने हिरावून घेतला आहे. पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी बोधेगाव सह परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.
आज बोधेगावसह परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने येथील पाताळ गंगेला मोठा पुर आला होता त्यामुळे शेवगांव - गेवराई हा राज्य मार्ग तब्बल पाच तास बंद होता या कालावधीत दोन ते तीन किमी च्या लांबच लांब रांगा याठिकाणी लागल्या होत्या.दरम्यान मागील वर्षी वातावरणातील बदलाने कपाशीवर बोंड आळी तर दिवाळी दरम्यान महिनाभर पडत आसलेल्या पावसाने बाजरीला व ईतर धानाला मोड आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते. तर यंदा वातावरण आणि पावसाचे प्रमाण सुरुवातीला चांगले राहिल्याने पिकाचा जोम आणि वाढ चांगली राहिली उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी पिकासाठी औषधाची फवारणी आणि रासायनिक खतावर खर्च केला परंतु एन कापूस वेचणीच्या दरम्यान पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने हातातोंडाशी आलेला घास नियतीने पुन्हा हिरावून घेतला आहे. सध्या कपाशी तुर कांदे सोयाबीन या पिकात मोठ्याप्रमाणात पाणी साचले आसुन कापसासह ईतर पिक देखील संकटात सापडली आहेत. जानकारांच्या मते पिकाना पाणी जास्त झाल्यास त्याची ॲक्सिजन घेण्याची क्षमता कमी होउन मुळ्या सडल्या जातात परिणामी पि
पिकाची वाढ खुटुन झाडे निकामी होतात. दरम्यान परतीच्या पावसा आगोदर पडलेला आणि आता परतीचा पाऊस मोठ्याप्रमाणात बरसल्याने शेतात उभ्या आसलेल्या कपाशी पिकांच्या दोड्या काळया पडण्यास सुरुवात झाली आहे तर काही ठिकाणी फुटलेला कापुस देखील शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत मातीत मिसळत आहे. त्यामुळे शासनाने सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत खात्यावर वर्ग करण्याची मागणी बोधेगाव सह कांबी, हातगाव,
मुंगी, बालमटाकळी, लाडजळगाव, आधोडी, दिवटे, शोभानगर, चेडेचांदगाव भागातील शेतकरी तसेच डॉ क्षितिज भैय्या घुले युवा मंच बोधेगाव परिसर तसेच माऊली प्रतिष्ठानचे आध्यक्ष सचिन घोरतळे यांनी केली आहे.
Comments