जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतीची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध
अहमदनगर । वीरभूमी - 02-Nov, 2020, 12:00 AM
माहे जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या सहिनीशी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे या सर्व ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू होणार असून दिवाळी नंतर पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्याची संधी मिळणार आहे.
जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. मात्र कोरोना संसर्गामुळे निवडणुका पुढे ढकलत या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले होते. मात्र राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसारदि. 27 ऑक्टोबर रोजी उपविभागिय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मान्यता देत सही केली होती.
त्यानंतर आज सोमवार दि. 2 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला (नमुना अ मध्ये) व्यापक प्रसिद्धी देण्यात आली आहे. त्यानुसार तहसीलदारांनी निवडणूक होत असलेल्या गावाच्या तलाठी यांना तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर निवडणुकीबाबत नमुना अ प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार जिल्ह्यातील निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना नमुना अ मध्ये नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केली आहे.
जिल्ह्यातील (कंसात प्रभागांची संख्या) अकोले 52 (115), संगमनेर 94 (328), कोपरगाव 29 (101), श्रीरामपूर 27 (102), राहाता 25 (110), राहुरी 46 (157), नेवासा 59 (233), नगर 57 (210), पाथर्डी 78 (250), शेवगाव 48 (160), कर्जत 56 (195), जामखेड 49 (155), श्रीगोंदा 59 (209), पारनेर 88 (325)अशा एकुण 767 ग्रामपंचातीची अंतिम प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
hrvHNTPqWzY