पाथर्डी । वीरभूमी - 03-Nov, 2020, 12:00 AM
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या कासार पिंपळगाव ग्रामपंचायतीची अंतिम प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाले आहे. प्रारुप प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांनी प्रभाग क्र. 3 मधील आरक्षण हे जात निहाय झाले नसल्याचे सांगत या विरोधात प्रांताधिकार्यांकडे हरकती नोंदवल्या होत्या. मात्र या हरकतीचा कोणताही परिणाम झाल्याचे जाहीर झालेल्या अंतिम प्रभाग रचना व आरक्षण यामध्ये दिसून आला आहे.
कासार पिंपळगाव ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर सध्या प्रशासक राज सुरू आहे. आता ग्रामपंचायती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीचा पहिला टप्पा असलेली प्रारुप प्रभाग रचना व प्रभाग निहाय जागेचे आरक्षण कोरोना संसर्गाच्या अगोदरच जाहीर होवून त्यावर हरकतीही नोंदवण्यात आल्या होत्या.
मात्र नोंदवण्यात आलेल्या हरकतीवर सुनावणी होण्याअगोदरच लॉकडाऊन जाहीर होवून निवडणूक कार्यक्रम आहे त्या परिस्थितीत स्थगित करण्यात आला होता. याच दरम्यान ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली. आता राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीची अंतिम प्रभाग रचना व आरक्षण जिल्हाधिकारी यांनी मान्य केल्यानंतर नमुना अ मध्ये जाहीर करण्यात आला आहे.
कासार पिंपळगाव ग्रामपंचायतीमध्ये एकुण 11 जागा निवडून द्यावयाच्या आहेत. प्रभाग रचना व त्यावरील आरक्षण पुढील प्रमाणे - प्रभाग क्र. 1 (एकुण जागा 3) पूर्व- निवडुंगे ते कासार पिंपळगाव रस्ता, दक्षिण - तिसगाव पारेवाडी शिव, पश्चिम - पारेवाडी शिव, उत्तर- जवखेडे पारेवाडी रस्ता. आरक्षण- 2 जागा सर्वसाधारण (महिला), 1 जागा सर्वसाधारण. प्रभाग क्र. 2 (एकुण जागा 3) पूर्व- हनुमान टाकळी रस्ता, दक्षिण- जवखेडे पारेवाडी रस्ता, पश्चिम- जवखेडे शिव, उत्तर- हनुमान टाकळी शिव. आरक्षण- 1 सर्वसाधारण, 1 नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), 1 सर्वसाधारण (महिला). प्रभाग क्र. 3 (एकुण जागा 2) पूर्व-पाडळी ढवळेवाडी शिव, दक्षिण- पाथर्डी रस्ता ते ग्रामपंचायत विहिर तलाव भिंती पर्यंत, पश्चिम- हनुमान टाकळी रस्ता, उत्तर- हनुमान टाकळी शिव. आरक्षण- 1 अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), 1 अनुसुचित जाती (महिला). प्रभाग क्र. 4 (एकुण जागा 3) पूर्व- सैदापूर शिव, दक्षिण- निवडुंगे शिव, पश्चिम-निवडुंगे ते कासार पिंपळगाव रस्ता, उत्तर- तलाव भिंत ग्रामपंचायत विहिर ते पाथर्डी रस्ता. आरक्षण- 1 अनुसुचित जाती (सर्वसाधारण), 1 नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण), 1 नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) अशा एकुण 11 जागांचे आरक्षण व प्रभाग रचना जाहीर झाली आहे.
अंतिम प्रभाग रचना व आरक्षण हे प्रारुप यादीप्रमाणेच कायम राहीले आहे. यामुळे ज्या व्यक्तींनी हरकती घेतल्या होत्या, त्यांच्यात नाराजीचा सूर आहे. आता अंतिम प्रभाग रचना व आरक्षण या विरोधात काहीजन न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते. यामुळे कासार पिंपळगावची निवडणूक सुरुवातीपासूनच न्यायालयीन फेर्यात अडकते की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
HkzFfBUXCn