मदत पुनर्वसन मंत्र्यांची माहिती
उद्धव देशमुख l वीरभूमी - 05-Nov, 2020, 12:00 AM
गेल्या महिण्यापुर्वी शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात तीन दिवसात २०० मिली.च्या वर पाऊस झाला. पावसाचे प्रमाण मोठे असल्याने शेतकऱ्यांचे पिक तर गेलच परंतु जमिनी देखील खणुन गेल्या. पिकावर असलेली बळीराजाची आशा सुटत चालल्याने नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे व पहाणी करत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते.
दरम्यान येउ घातलेल्या दिवाळी पुर्वी मदत देणार आसल्याचे ही यावेळी सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी येत्या सोमवार पासुन पैसे जमा केले जाणार आसल्याची माहिती दिली आहे. दरम्यान हेक्टरी १० हजाराची मदत दोन हेक्टर पर्यंत मिळणार आसल्याने बळिराजाला थोडासा हातभार मिळणार आहे.
yeYEGrWBkwamIQ