सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे मागणी
कोपरगाव । वीरभूमी - 09-Nov, 2020, 12:00 AM
कोरोना काळात दळणवळण बंद असल्याने राज्यातील तमाम वाहन चालकांना स्वतःसह कुटुंबाला उपासमारीचा सामना करावा लागला. लॉकडाउन काळात सर्वाधिक फटका बसलेल्या या घटकाला खर्या अर्थाने मदत करण्याची गरज आहे. सणासुदीच्या काळात चालकांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्यातील सर्वच वाहन चालकांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी भाजपाच्या सचिव, माजी आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे केली आहे.
जगासह, देशभरात थैमान घातलेल्या कोरोना संसर्गामुळे महाराष्ट्रातही लॉकडाउन करण्यात आले होते. मार्च महिन्यापासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे दळणवळण पूर्णपणे थांबलेले होते. या कालावधीमध्ये राज्यभरातील असंख्य चालकांचा रोजगार बंद झाल्याने त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली. यामध्ये रस्त्यावर धावणार्या हजारो वाहनचालकांचा समावेश आहे.
रिक्षाचालक, ट्रक चालक, इतर विविध वाहनांच्या चालकांचा रोजगार पुर्णपणे बंद झाल्याने या घटकाला स्वतःसह कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे जिकरीचे झाले आहेे. अनेक कुटूंबे या परिस्थितीमुळे उध्दवस्त झाले आहे. अनेकांना अविचाराने ग्रासले असुन या संकटातून मार्ग काढणे मुश्कील झाले आहे. आर्थीक विवंचनेत असणार्या चालकांना ही समस्या आजही भेडसावत आहे.
दिवाळी सारखा सण तोंडावर आला असल्याने कुटूंबासह वाहन चालक हतबल झालेले आहेत. चालक हा बाजारपेठेचा प्रमुख घटक असुन कोरोनाच्या या परिस्थितीत चालकांच्या नशिबी आलेली अवस्था दुदैवी असून त्यांना शासनाने आर्थीक मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी सौ. कोल्हे यांनी केली आहे.
dvWBIEXo