ना.बच्चू कडू यांनी संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांना लक्ष घालण्याचे दिले आश्वासन
अहमदनगर । प्रतिनिधी 11-Nov, 2020, 12:00 AM
बक्तरपूर ( वार्ताहर ) -
शालेय शिक्षण राज्यमंत्री ना. ओमप्रकाश ( बच्चूभाऊ ) कडू यांना शिक्षकेतर कर्मचा-यांचे प्रलंबित प्रश्नांचे निवेदन महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाच्या जिल्हा पदाधिका-यांनी जलसंपदा विभागाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी देण्यात आले.यावेळी राज्यमंत्री ना.कडू यांनी उपस्थित संघटनेच्या पदाधिकाऱ्याना आपले प्रश्नात जातीने लक्ष घालून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.असल्याची माहिती शेवगांव तालुक्यातील बक्तरपूर येथील शिक्षकेतर कर्मचारी बाळासाहेब जाधव यांनी दिली.
ना.कडू यांना दिलेल्या निवेदनात शासन नियुक्त समितीने शिफारस केल्यानुसार शिक्षकेतर कर्मचारी यांची त्वरीत भरती व्हावी.माध्यमिक शाळांमधील कर्मचा-यांसाठी बक्षी समितीने शिफारस केल्या प्रमाणे 10,20,30 वर्षानंतरची आश्वसीत प्रगती योजना लागू करावी.शिक्षकेतर कर्मचारी यांना विना अट पदोन्नती मिळावी व पदोन्नती दिलेल्या शिक्षकेतर कर्मचारी यांच्या तात्काळ मान्यता मिळावेत.शिक्षकेतर कर्मचा-यांचे अनुकंपा तत्वावरील नियुक्ती व्हावी व प्रलंबित मान्यता मिळावेत तसेच शालार्थ आय डी क्रमांक मिळावेत.शिक्षकेतर कर्मचारी यांची अर्जीत रजा 300 दिवसांची मर्यादा वाढविणेत यावी.शिपाई पदांवरील कर्मचारी पदोन्नती मिळावेत व सहावा वेतन आयोग वसूली थांबवावी.दि.1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे अंशतः अनुदिनावरील कर्मचारी व नतंर नियुक्ती कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.कोविड आजार विशेष बाब म्हणून वैद्यकीय बिलास मंजूरी मिळावी.अशा मागण्या करण्यात आल्या.
यावेळी पुणे विभागीय सचिव गोवर्धन पांडुळे, जिल्हाध्यक्ष भिमाशंकर तोरमल, जिल्हासचिव भानुदास दळवी, हिशोब तपासणीस किशोर मुथ्था, नेवासा तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव आदी.उपस्थित होते.
Comments