बुधवारी पाथर्डी तालुक्यात 20 तर शेवगाव तालुक्यात 14 कोरोना बाधित आढळले
पाथर्डी, शेवगाव । वीरभूमी - 18-Nov, 2020, 12:00 AM
आज बुधवार दि. 18 रोजी पाथर्डी तालुक्यात करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन, खाजगी व शासकीय कोरोना तपासणीत पाथर्डी शहरातील 8 व तालुक्याच्या ग्रामीण भागात 12 असे एकुण 20 कोरोना बाधित आढळले. तर शेवगाव तालुक्यात करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन चाचणीत 14 कोरोना बाधित आढळले.
आज बुधवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये पाथर्डी शहरातील फुलेनगर 2, शिक्षक कॉलनी 2, चिंचपूर रोड 1, लकार गल्ली 2, शिवशक्ती नगर 1 असे 8 कोरोना बाधित आढळले.
तर तालुक्यातील जिरेवाडी 1, तिसगाव 5, निवडुंगे 1, भिलवडे 1, टाकळी मानूर 1, कीर्तनवाडी 1, हनुमान टाकळी 1, माळेगाव 1 असे एकुण 20 कोरोना बाधित आढळले.
जिल्हा आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार शेवगाव तालुक्यातील रॅपिड अँटीजेन चाचणीत 14 कोरोना बाधित आढळले. तर आज पाथर्डी तालुक्यातील 32 तर शेवगाव तालुक्यातील 11 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, बाहेर जातांना तोंडाला मास्क लावावा, हात नियमित स्वच्छ धुवावे व सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करून कोरोना पासून बचाव करावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
WPQzhGkeqioKFfr