पालिकेच्या 21 प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर
शेवगाव । वीरभूमी - 27-Nov, 2020, 12:00 AM
शेवगाव नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आज पालिकेची प्रभाग निहाय आरक्षण सोडत प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. आज निघालेल्या आरक्षणामध्ये अनेक मात्तबरांचे प्रभाग आरक्षीत झाल्याने हिरमोड झाला. यामुळे शेवगावत ‘कही खुशी, कही गम’ची स्थिती पहायला मिळत आहे.
शेवगाव पालिकेची प्रभाग निहाय आरक्षण सोडत तहसील कार्यालयात प्रांताधिकारी देवदत्त केकाण, पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आंबादास गर्कळ, अव्वल कारकुन नितीन बनसोडे यांच्यासह इच्छुकांच्या उपस्थितीत काढण्यात आले. यावेळी कु. साक्षी व कु. सीफा यांच्या हाताने चिठ्ठी काढून आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
पालिकेची प्रभाग निहाय आरक्षण सोडत पुढील प्रमाणे - प्रभाग 1- खुला, प्रभाग 2- खुला, प्रभाग 3- खुला, प्रभाग 4- खुला, प्रभाग 5- सर्वसाधारण स्त्री, प्रभाग 6- सर्वसाधारण स्त्री, प्रभाग 7- नागरीकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग 8- सर्वसाधारण महिला, प्रभाग 9- अनुसुचित जाती व्यक्ती, प्रभाग 10- सर्वसाधारण महिला, प्रभाग 11- खुला, प्रभाग 12- सर्वसाधारण महिला, प्रभाग 13- नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव, प्रभाग 14- नागरीकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग 15- सर्वसाधारण स्त्री, प्रभाग 16- नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव, प्रभाग 17- नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव, प्रभाग 18- खुला, प्रभाग 19- अनुसुचित जाती स्त्री राखीव, प्रभाग 20- नागरीकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग 21- अनुसुचित जाती स्त्री राखीव.
पालिका निवडणुकीत 50 टक्के जागा या महिलानसाठी राखीव आहेत. मात्र नेहमीप्रमाणे आरक्षण सोडतीला एकही महिला उपस्थित राहीली नाही. सोडतीमध्ये अनेक इच्छुकांच्या प्रभागात आरक्षण पडल्याने अडचण निर्माण झाली आहे. महिला आरक्षणामुळे इच्छिुकांना आता आपल्या सौभाग्यवतीसाठी उमेदवारी मागावी लागणार आहे.
Comments