श्रीगोंदा तालुक्यात बुधवारी आढळले 7 जण पॉझिटिव्ह
श्रीगोंदा । वीरभूमी - 02-Dec, 2020, 12:00 AM
श्रीगोंदा तालुक्यात बुधवार दि. 2 रोजी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. घेतलेल्या 42 रॅपिड अँटीजन चाचण्यांत 6 जण पॉझिटिव्ह आले. तर नगर येथून आलेल्या अहवालात 1 जण संक्रमित आला.
बुधवारी 104 संशयित रुग्णांचे घशातील स्राव घेऊन नगर येथे तपासणीसाठी पाठवले. एकूण बधितांची संख्या 2434 झाली आहे. मंगळवारी 1 जण बरा होऊन घरी परतला. एकूण कोरोनामुक्तांची संख्या 2360 झाली आहे. सद्यस्थितीला 21 जण कोविड केंद्रात उपचार घेत आहेत. तर खाजगी हॉस्पिटलमध्ये 17 जण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 36 जणांचा मृत्यू झाला आहे. अजून 150 संशयित रुग्णांचे अहवाल येणे बाकी आहे.
बुधवार दि. 2 रोजी श्रीगोंदा शहरात एकही रुग्ण आढळला नाही. तर ग्रामीण भागात आढळगाव-1, मांडवगण-1, चिखलठाणवाडी-1, देऊळगाव-1, सुरेगाव-1, हंगेवाडी-1, टाकळी कडेवळीत येथे 1 रुग्ण पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.
Comments