शेवगावात 55 जुगार्यासह 35 लाख 85 हजारांचा मुद्देमाल ताब्यात
पोलिस महानिरिक्षकाच्या पथकाचा छापा । शेवगावसह पाथर्डी, नेवासा, औरंगाबाद, गंगापूर, आष्टी येथील जुगार्यांचा समावेश
शेवगाव । वीरभूमी - 10-Dec, 2020, 12:00 AM
शेवगाव पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी नेमलेल्या पथकाने छापा टाकून तब्बल 55 जुगार्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 35 लाख 85 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा जुगार अड्डा नेवासा रोडवरील स्टेट बँकेच्या समोर रोड लगत असलेल्या मोकळ्या जागेतील फिरोज इनामदार यांच्या मालकीच्या पत्र्याच्या गोडाऊनमध्ये सुरू होता. शेवगाव शहरातील अवैध धंद्यावर विशेष पोलिस महानिरिक्षक यांच्या पथकाने कारवाई केल्याने शेवगाव पोलिसांचा निष्क्रीय कारभार समोर आला असून अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव शहरातील नेवासा रोडवर असलेल्या स्टेट बँकेच्या समोरील रोडलगत फिरोज ईनामदार यांचे मालकीचे पत्र्याचे बंद मोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची खबर विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांना समजल्यानंतर त्यांनी विशेष पथक तयार करून सदरील ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले. यानंतर सपोनि. सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक राजेंद्र सोनवणे, पोना. नितीन सकपाळ, पोकाँ. उमाकांत खापरे, पोकाँ. विश्वेश हजारे, पोकाँ. चेतन पाटील, पोकाँ. अमोल भामरे, पोकाँ. नारायण लोहरे, पोकाँ. सुरेश टोंगारे यांच्या पथकाने सदरील ठिकाणी बुधवार दि. 9 डिसेंबर रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास छापा टाकला. यावेळी सदरील ठिकाणी जमिनीवर बसून काही लोक 52 पत्त्यांच्या कॅटमधील अंकावर व चित्रावर पैसे लावून झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळतांना आढळुन आले.
पथकाने छापा टाकून तब्बल 55 जुगार्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 2 लाख 70 हजार 360 रुपये रोख रक्कम, 4 लाख 39 हजार रुपयेकिंमतीच्या मोटार सायकली, 28 लाख रुपये किंमतीच्या कार व जीप, 76 हजार 500 रुपयाचे जुगाराचे साहित्य असा एकुण 35 लाख 85 हजार 860 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात देविचंद बेलाजी बराडे (रा. धामनगाव, ता. आष्टी), उमेश मुलजीभाई कोटक (रा. राजकोट, गुजरात), गणेश भानुदास गाडे (रा. विद्यानगर, शेवगाव), गोवर्धन हरिदास मजिठिया (रा. मीरारोड, मुंबई), मुनाफ रफिक शेख (रा. नायकवाडी मोहल्ला, शेवगाव), राजू भिमराव निकाळजे (रा. साकेगाव, ता. पाथर्डी), रफिक बहुद्दीन शेख (रा. संजयनगर, औरंगाबाद), अरुण माणिक राठोड (रा. कळसपिंप्री, ता. पाथर्डी), जाकीर बुर्हान शेख (रा. इंदिरानगर, शेवगाव), सुभाष संतोष तुपे (रा. बिडकिन, ता. पैठण), स्वप्नील जनार्दन थोरात (रा. नेवासा), अल्ताफ अब्बास शेख (रा. लिजली वस्ती, शेवगाव), हरिदास उर्फ हरिभाऊ विठ्ठल सुपारे (रा. खंडोबानगर, शेवगाव), भागीनाथ विठोबा खर्चन (रा. आखेगाव, ता. शेवगाव), हरकु निराळे भोसले (रा. शेवगाव), सखाराम सोनाजी कुसळकर (रा. वडारगल्ली, शेवगाव), गणेश भिमा शिनगारे (रा. लोळेगाव, ता. शेवगाव), चंद्रकांत रमेश वैरागर (रा. घोडेगाव, नेवासा), सुनील सुरेश धोत्रे (रा. वडरवाडा, शेवगाव), अंकुश रामराव लंबाटे (रा. घोटण, ता. शेवगाव),
दत्तू विश्वनाथ होडशिळ (रा. भिमनगर भाऊसिंगपुरा, औरंगाबाद), सय्यद शौकत सय्यद बशिर (रा. कॉर्पेशन जवळ, औरंगाबाद), सचिन रमेश आदमाने (कोर्टा समोर, शेवगाव), नारायण बायकृष्ण फुंदे (रा. ब्राम्हणगल्ली, शेवगाव), श्रीकांत तुकाराम काळे (रा. कुकाणा, ता. नेवासा), विष्णु साहेबराव लवघळे (रा. भिऊधानोरा, ता. गंगापूर), बप्पासाहेब त्र्यंबक विघ्ने (रा. कोर्टा मागे, शेवगाव), अर्जुन जानबापू चौधरी (रा. धामनगाव, ता. आष्टी), पंडीत शंकर कुसळकर (रा. वडरगल्ली, शेवगाव), शिवनाथ रामभाऊ ढाकणे (रा. मुरर्शतपूर, ता. शेवगाव), राहुल विश्वास पंडित (रा. घोडेगाव, ता. नेवासा), गोरख सुदाम हिवाळे (रा. भिऊधानोरा, ता. गंगापूर), नवनाथ गोरखनाथ खैरे (रा. आगरवाडगाव, ता. गंगापूर), राजेश आंबादास राठोड (रा. सिद्धीविनायक कॉलनी, शेवगाव), अल्ताफ गयोसोद्दीन ईनामदार (रा. नेहरुनगर, शेवगाव), राजू बाजीराव दिनकर (रा. पाथर्डी), पांडुरंग पुंडलिक नवरंगे (रा. आगरवाडगाव, ता. गंगापूर),
सऊद मसूद अहमद (रा. मकसूद कॉलनी, औरंगाबाद), जफर हुसैन कादर हुसैन (रा. सिटी चौक पोलिस स्टेशन मागे, औरंगाबाद), शेख रिायाज शेख मुसा (रा. रेणुकामाता मंदिराजवळ, औरंगाबाद), राहुल राजू दिनकर (रा. पाथर्डी), संजय सर्जेराव चितळे (रा. पाथर्डी), जलाल सुन्ना शेख (रा. तिसगाव, ता. पाथर्डी), यावरखान लालखान पठाण (रा. जिप्सी, औरंगाबाद), अरुण बन्सी कोलते (रा. माळी बाभुळगाव, ता. पाथर्डी), सचिन रामचंद्र कोकळे (रा. पुंडलिकनगर, शेवगाव), योगेश जिभाऊ जाधव (रा. देवळाली गाव, ता. नाशिक), अरबाज अल्ताफ ईनामदार (रा. इंदिरानगर, शेवगाव), अमित किशोर शिनदे (रा. धामनगाव, ता. आष्टी), कांतीलाल नामदेव सुखधान (रा. आगरवडगाव, ता. गंगापूर), मिनीनाथ लक्ष्मण भवार (रा. कळसपिंप्री, ता. पाथर्डी), विवेक राधाकिसन घुले (रा. नेवासा), जावेद सिराबुद्दीन खान (रा. जयसिंगपुरा, औरंगाबाद), आंबादास श्रीधर चितळे (रा. चितळेवाडी, ता. पाथर्डी), आबासाहेब शनकर काळोखे (रा. पाथर्डी) या 55 जणांवर भाग 6 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4/5 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेला जुगार अड्डा शेवगाव पोलिसांना अद्यापर्यंत का दिसला नाही? अगर या जुगार अड्ड्यावर जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले का? असे प्रश्न उपस्थित केले जात असून विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर काय कारवाई करात याकडे लक्ष्य लागले आहे.
Comments