सरपंचपदाची आरक्षण सोडत आता ग्रामपंचायत निवडणुकीनंतर
मुंबई । वीरभूमी- 11-Dec, 2020, 12:00 AM
नुकताच जाहीर केलेला सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. हा रद्द केलेला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम ग्रामपंचायत निवडणुकीनंतर म्हणजे 15 जानेवारी 2021 नंतर घेण्याचे आदेश निवडणूक आयोागाने सर्व जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
या निर्णयामुळे सरपंच पदासाठी असलेला उमोदवार हा गुलदस्त्यात राहणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत वेगळीच रंगत पहायला मिळणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम आज शुक्रवारी जाहीर केला. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच निवडणूक हालचालींना वेग आला आहे. मात्र सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने स्थगित केला असून आता आरक्षण सोडत ग्रामपंचायतीसाठी मतदान झाल्यानंतर होणार आहे. यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
Comments