नविन वर्षात जाहीर होणार नवी बाॅडी
सोनई । संदीप दरंदले 14-Dec, 2020, 12:00 AM
शनिशिंगणापुर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्थपदासाठी 11 जागांसाठी विक्रमी 84 जणांनी अर्ज दाखल केले आहे. अर्जदारांच्या 21, 22 व 23 डिंसेबर रोजी धर्मादाय आयुक्त कार्यालयात मुलाखती होणार असुन नविन वर्षात नवी विश्वस्थव्यवस्था जाहिर होणार आहे.
सहायक धर्मादाय आयुक्त अहमदनगर यांनी जुन्या कायदानुसार शनैश्वर देवस्थानच्या निवडीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. भाजपा सरकारने जुन 2018 रोजी शनैश्वर देवस्थान सरकारच्या ताब्यात आणण्यासाठी विधीमंडाळात कायदा पास केला होता. पण दोन वर्ष झाले तरी शनैश्वर देवस्थान मध्ये सरकारी अधिकारी नियुक्त केला नाही. यामुळे धर्मदाय आयुक्तांनी जुन्या विश्वस्थव्यवस्था कायदानुसार निवडीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. यात 84 जणांनी विश्वस्थ पदासाठी अर्ज दाखल केले आहेत.
यात गावातील शेटे आडनावाचे 26, दरंदले 19, बानकर 19 तर कुर्हाट 9 इतर आडनावाचे 11 अर्ज दाखल झाले आहेत. यात महिलांचे पण 11 अर्ज दाखल झाल्याने चुरस निर्माण झाली आहे. यात चार माजी अध्यक्ष दादासाहेब दरंदले, डाॅ. रावसाहेब बानकर, प्रा. शिवाजी दरंदले, अनिता शेटे यांच्यासह तीन माजी उपाध्यक्ष सुरेश बानकर, सोपान बानकर व भाऊसाहेब दरंदले यांनी अर्ज दाखल केल्याने चुरस वाढली आहे.
तसेच या बाॅडीतील जेष्ठ विश्वस्थ आदिनाथ शेटे यांचे पण नाव जुने निष्ठावान म्हणुण चर्चेत आहे. यात दरंदले, शेटे, बानकर या आडनावाचे जास्त संख्या या गावात असल्याने तसेच एकमेकांचे नातेवाईक आहेत. यामुळे या निवडीत कोण कोण शनिदेवाची प्रामाणिक सेवा करण्यासाठी विश्वस्थ होणार हे नविन वर्षात जाहिर होणार आहेत.
Comments