आमदार आशुतोष काळे यांची माहिती
कोपरगाव । वीरभूमी - 15-Dec, 2020, 12:00 AM
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील २९६ डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना २०१९-२० मध्ये झालेल्या नैसर्गिक नुकसानीपोटी हवामान आधारित फळपिक विम्याचे १.३५ कोटी मंजूर झाले असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघात मागील वर्षी शेकडो हेक्टर डाळिंब पिकावर नैसर्गिक आपत्ती येवून डाळींब बागांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते.मागील वर्षी मोठ्या प्रमाणात झालेली अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे डाळिंब बागांचे अतोनात नुकसान होवून शेतकऱ्यांचे स्वप्न उध्वस्त झाली होती. त्यावेळी झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या होत्या. जेणेकरून या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना फळपिक विम्याचा जास्तीत जास्त लाभ होईल यासाठी पाठपुरावा सुरु होता.
त्या पाठपुराव्याला अपेक्षित यश मिळाले असून मतदार संघातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना १.३५ कोटीची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली असून हि रक्कम लवकरच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.
मागील वर्षापासून शेतकरी अनंत अडचणींचा सामना करीत आहे. यावर्षी वैश्विक कोरोना संकटाचा फटका हा सर्व घटकांबरोबरच शेती व्यवसायाला देखील मोठ्या प्रमाणात बसला असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत.
अशावेळी डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना हवामान आधारित फळपिक विम्याचे १.३५ कोटी मंजूर झाल्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
CJfqMPNgOGVm