पारनेर बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक
पारनेर । वीरभूमी - 15-Dec, 2020, 12:00 AM
पारनेर कृषि उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी दुपारी एक ते रात्री अकरा वाजेपर्यंत विक्रमी कांद्याची आवक झाली आहे. या कांद्याचा लिलाव हा बुधवारी होणार आहे. पारनेर बाजार समितीत कांदा लिलाव आठवड्यातील रविवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवशी होतो. रविवारी पारनेर बाजार समितीमध्ये कांद्याला 3500 ते 4000 रूपये भाव मिळाल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण होते.
पारनेरमध्ये नवीन कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने शेतकरी आपला जुना व नवीन कांदा विक्रीसाठी पारनेर बाजार समितीत घेऊन येत आहे. त्यातच रविवारी झालेल्या कांदा लिलावात शेतकर्यांच्या कांदा पिकाला चांगला भाव मिळाला होता. यामुळे कांदा उत्पाकांनी आपला कांदा विक्रीसाठी पारनेर बाजार समितीतच आणण्याचा निर्णय घेतल्याने मंगळवारी दुपारपासून हजारो वाहनांच्या साह्याने पारनेर बाजार समितीमध्ये कांदा आवक झाली आहे.
संध्याकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत बाजार समिती ते मुख्य रस्त्यांवर एक किलोमीटरपर्यंत कांदा वाहतूक करणार्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे पारनेर शहरातील रस्त्यांवर रात्रीच्यावेळीही वाहनाच्या रांगा दिसत होत्या.
पारनेर शहरातील वाहतुक कोंडी झाल्याने पारनेर पोलीसांनी बस स्टँडवर वाहणे वळवून वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. बाजार समितीत एकाच वेळी वाहनांची संख्य़ा वाढल्याने प्रभारी सचिव शिवाजी पानसरे व कर्मचारी वाहन चालकांना मार्गदर्शन करीत होते.
rWvAqGYoclhEgX