फक्त इ. स. 2020 च नाहीतर ही वर्षेही गेली होती वाईट
फक्त इ. स. 2020 च नाहीतर ही वर्षेही गेली होती वाईट
अहमदनगर । वीरभूमी- 27-Dec, 2020, 12:00 AM
आपण आता 2020 ला निरोप देत 2021 च्या नववर्षात पदार्पण करणार आहोत. मात्र, 2020 हे वर्ष सगळ्याच अर्थानं जगासाठी वाईट राहिलं. या वर्षभरात कोरोनानं सुमारे 10 लाखांहून अधिक लोकांचा जीव गेला आहे.कोरोनामुळे याच वर्षात आर्थिक मंदी आली. अनेकांना रोजगार गमवावा लागला. याशिवाय, जगभरातील हिंसक घटना, जंगलांना लागलेल्या आगी, अनेक ठिकाणी आलेले महापूर आणि जगावर घोंगावणारं युद्धाचं संकट हे सगळं 2020 मध्ये आपण पाहिलं. यामुळे आपण या 2020 वर्षाला सर्वात वाईट वर्ष म्हणतोत. मात्र या अगोदरही काही वर्ष 2020 पेक्षा वाईट गेली आहेत. ती वर्षे अशी-
1) सन 536 या वर्षात लाखो लोकांनी भुकेनं बळी गेला.
सन 2020 मधील कोरोना काळात अनेकांना उपाशीपोटी झोपावं लागल्याचे आपण पाहिले. याच काळात अनेकांच्या नोकर्या गेल्यानं दोन वेळचे जेवण मिळणंही मुश्कील झालं होत. मात्र, आजपासून सुमारे 1500 वर्षांपूर्वी जगभरात लाखो लोकांचा भूकेनं बळी गेला होता. इ.स. 536 मध्ये जगात 2 अतिविशाल ज्वालामुखींचा स्फोट झाला होता. या स्फोटामुळं सगळ्या पृथ्वीभोवती धुळीची जाड चादर पसरली गेली. त्यामुळं तब्बल 18 महिने सूर्यप्रकाशही जमिनीपर्यंत पोहचू शकला नाही. सूर्यप्रकाश न मिळाल्यानं सगळी पिकं जळून गेली. जगभरात अन्नधान्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला. पृथ्वीचं तापमानही अचानक खाली गेलं. युरोपात मोठा दुष्काळ पडला आणि त्यात लाखो लोकांनी आपले प्राण गामवले होते.
2) इ. स. 1347 या वर्षात कोरोनाहूनही भयानक रोगानं कोट्यवधी लोक दगावले होते.
ब्युबोनिक प्लेग, मानवजातीच्या मुळावर उठलेली महामारी, ज्यात कोट्यवधी लोकांना प्राण गमवावे लागले. ही घटना घडली इ. स. 1347 ते 1352 दरम्यान. या रोगाने इ. स. 1348 साली या रोगानं थैमान घालायला सुरुवात केली. ज्यामुळं कोट्यवधी लोक संक्रमित झाले. शरीरावर डाग पडायचे आणि ताप, उलट्या आणि थंडी भरुन यायची. युरोपातील तब्बल 5 कोटी लोकांना या रोगाचे संक्रमण झाले होते. आफ्रिका, आशिया आणि युरोपात या रोगानं थैमान घातल होत. एकट्या भारतात 1855 ते 1900 सालात तब्बल 1 कोटी 20 लाख लोकांनी प्राण गमावले.
3) इ. स. 1770 या वर्षात भीषण दुष्काळानं अनेकांनी प्राण गमावले.
इ. स. 1770 या वर्षात बंगाल प्रांतात मोठा दुष्काळ पडला होता. अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होवून बांगलादेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओडीसामध्ये लोक पाण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करु लागले. याच दरम्यान, तब्बल 1 कोटी लोकांनी प्राण गमावल्याची माहिती आहे. बंगाल प्रांतातील तब्बल एक तृतीयांश लोकसंख्या या दुष्काळानं संपवली. इ. स. 1972 साली पडलेला दुष्काळही महाराष्ट्राच्या मनातून पुसलेला नाही. याआधी इतका मोठा दुष्काळ महाराष्ट्रानं कधीही पाहिला नव्हता. या दुष्काळात अनेकांनी आपल्या नातेवाईकांना गमावलं आहे. तर अनेक शेतकर्यांना आपल्या जनावरांना डोळ्यासमोर मरताना पाहावं लागलं होतं. कोरोना संकटाहूनही भीषण संकट त्यावेळी लोकांनी अनुभवलेलं आहे.
4) इ. स. 1783 या वर्षात ज्वालामुखीनं जगाला जेरीस आणलं होतं.
इ. स. 1783 वर्षात आईस लँडमधील लाकी हा ज्वालामुखी सक्रीय झाला आणि तब्बल 8 महिने त्यात स्फोट होत राहिले. यामुळं जगाच्या काही भागात तापमानात मोठी वाढ झाली. तर काही भागात तापमान शुन्याच्याही खाली गेलं. उत्तरी धुव्राजवळ राहणार्या लोकांच्या श्वासात विषारी वायुचा समावेश वाढला. अनेक भागात रासायनिक पाऊस पडला. त्यामुळं लाखो प्राण्यांचा मृत्यू झाला. आईस लँडच्या तब्बल 20 टक्के लोकसंख्या या नैसर्गिक आपत्तीत संपली. त्यानंतर जगभरात अन्नधान्याची कमी झाली आणि त्यातही लाखो लोकांनी आपले प्राण गमावले.
5) इ. स. 1918 या वर्षात स्पॅनिश फ्लूने 5 कोटी लोकांचा बळी घेतला.
क1छ1 एन्फ्लुएन्झा फ्लूनं जगाला जेरीस आणलं होतं. जगातील प्रत्येक 3 लोकांमधील एका माणसाला याचे संक्रमण झालं होतं. एका अंदाजानुसार जगात तब्बल 50 कोटी लोक या फ्लूमुळं संक्रमित झाले. तर जगभरात तब्बल 5 कोटी लोकांचा या फ्लूनं मृत्यू झाला. ही फक्त रेकॉर्डवरील संख्या आहे, मृतांचा आकडा याहूनही अधिक होता असं जाणकार सांगतात. उत्तर भारतात या फ्लूमुळं तब्बल 1 कोटी 30 लाख लोकांनी प्राण गमावले. भारताच्या लोकसंख्येच्या तब्बल 6 टक्क्यांपर्यंत लोकांचा या फ्लूमुळं मृत्यू झाला होता.
6) 1943 या वर्षात झालेल्या दुसर्या महायुद्धाने सर्वात कठीण वर्ष ठरले.
1943 ला दुसर्या महायुद्धाचे चटके मानवजातीला बसण्यास सुरुवात झाली. जर्मनीसह अनेक देशांमधील युद्धातील कॉन्स्ट्रेशन कॅम्प हे नरसंहाराचे अड्डे झाले. ब्रिटनची अवस्थाही या युद्धात अतिशय बिकट होती. भारतातही या युद्धानं गंभीर परिणाम केले. अन्नधान्याची मोठी कमतरता जाणवली. सगळं अन्नधान्य सैनिकांसाठी पाठवण्यात येत असल्यानं नागरिकांना अन्नधान्य कमी पडले होते. त्याच काळात अनेक भागात पडलेल्या दुष्काळानं पिकांचं नुकसान झालं. परिणामी या काळात तब्बल 30 लाख भारतीयांना आपला जीव गमवावा लागला.
7) 1947 हे वर्ष भारत-पाक फाळणीमुळे सर्वाधिक कठीण गेले.
स. न. 1947 साली भारत-पाक फाळणी झाली. यामुळे हे वर्ष अनेकांसाठी सर्वाधिक कठीण राहिलं. पंजाबला याचे सर्वाधिक चटके बसले. पंजाबसह सिंध प्रांतात दंगली उसळल्या. या दंगलींमध्ये तब्बल 4 ते 5 लाख लोकांनी प्राण गमावले. या विभाजनात तब्बल दीड कोटी लोकांना आपलं घर सोडावं लागलं. दंगलींचं हे सत्र विभाजनानंतरही थांबलं नाही, आणि या सगळ्यात देशभरात तब्बल 20 ते 25 लाख लोकांनी आपले प्राण गमावल्याची माहिती आहे.
Nitin veer