आ. निलेश लंके यांच्या प्रयत्नांना यश । राळेगणसिद्धी ग्रामपंचायतीत चुरस
पारनेर । लतिफ राजे - 04-Jan, 2021, 12:00 AM
पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी गेले पंधरा दिवस प्रत्येक गावच्या गावपुढार्यांचे व उमेदवारांच्या भेटीगाठी घेत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध कशी करता येईल. गावातील तंटे, संघर्ष व दोन गटातील वैमनस्य संपविण्यासाठी प्रयत्न केला. आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यात त्यांना चांगले यशही मिळाले.
पारनेर तालुक्यातील 88 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 776 जागांपैकी 188 जागा बिनविरोध झाल्या. या 88 ग्रामपंचायती पैकी नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून एक व दोन जागांसाठी निवडणूक लागली असे एकूण सात गावे आजच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राहिले. सदर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार निलेश लंके यांना पारनेर तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींमध्ये यश आले.
पारनेर तालुक्यातील महत्त्वाची समजली जाणारी हंगा ग्रामपंचायती सह रांधे, शिरापूर, कारेगाव, पिंपरी पठार, जाधववाडी, भोयरे गांगर्डा, पळसपूर, धोत्रे खुर्द या पारनेर तालुक्यातील नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर पाबळ, जातेगाव, पठारवाडी या बिनविरोध होण्याच्या मार्गावर असणार्या ग्रामपंचायती केवळ एक-एक जागेमुळे बिनविरोध होऊ शकल्या नाहीत. वडगाव दर्या, डिकसळ, शेरे कासारे, माळकुप या चार ग्रामपंचायती बिनविरोध होण्यापासून थोड्या फरकाने दूर राहिल्या. त्यामुळे पारनेर तालुक्यातील 776 जागांपैकी 188 जागा बिनविरोध झाल्या आहेत.
आता 15 नोव्हेंबरला निवडणूक होणार्या प्रमुख ग्रामपंचायतीमध्ये सुपा, टाकळी ढोकेश्वर, निघोज, राळेगणसिद्धी आदी राहिल्या असून तेथे चुरशीची लढत होणार असल्याने संपुर्ण तालुक्याचे त्याकडे लक्ष लागले आहे.
DfTgiPzlMeJpnIKG