जिल्हा बँकेसाठी चंद्रशेखर घुले, अण्णासाहेब म्हस्के यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा
अहमदनगर । वीरभूमी - 25-Jan, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या शेवगाव तालुका सोसायटी मतदार संघातून माजी आ. चंद्रशेखर घुले व राहाता तालुक्यातून सोसायटी मतदार संघासाठी अण्णासाहेब म्हस्के यांचे प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने या दोन्ही निवडी बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निवडीची अधिकृत घोषणा अर्ज छाननी नंतर होणार आहे. मात्र प्रत्येकी एक अर्ज आल्याने बिनविरोध निवडी निच्छित आहेत. या निवडीबद्दल राहाता व शेवगाव तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
जिल्हा बँकेसाठी आज सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. उमेदवारी अर्ज दाखलच्या शेवटच्या दिवसा अखेर शेवगाव तालुका सोसायटी मतदार संघातून माजी आ. चंद्रशेखर घुले व राहाता तालुका सोसायटी मतदार संघातून अण्णासाहेब म्हस्के यांचे प्रत्येकी एक अर्ज दाखल झाले. यामुळे या दोन्ही निवडी बिनविरोध होणार आहेत. मात्र अधिकृत घोषणा बाकी आहे.
अण्णासाहेब म्हस्के यांची संचालक म्हणुन निवड झाल्यानंतर त्यांचा बँक आवारात भाजप नेते माजी आमदार वैभवराव पिचड व जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन सिताराम पा. गायकर यांनी फेटा बांधून व शाल देऊन सत्कार केला. यावेळी प्रकाश मालुंजकर, बाळासाहेब ताजने, कचरू पा.शेटे, प्रताप देशमुख, शरद चौधरी, गोरक्ष मालुंजकर, राजेंद्र डावरे, यशवंतराव आभाळे, कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे आदी उपस्थित होते.
तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची संचालकपदी निवडी बद्दल शेवगाव तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
Comments