बोगस रेशनकार्ड शोधण्यासाठी होणार पडताळणी
मुंबई । वीरभूमी - 02-Feb, 2021, 12:00 AM
राज्यातील अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेण्यासाठी 1 फेब्रुवारी ते 3 एप्रिल 2021 या कालावधीत राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मोहीम हाती घेतली आहे.
बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र आणि आस्थापना या 6 प्रकारच्या शिधापत्रिका कुटुंबास देण्यात येतात. मात्र, अनेक शिधापत्रिका अपात्र आहेत, तरी त्यांच्या धान्याचा कोटा रास्त भाव दुकानदार उचलत आहेत. म्हणून केंद्र सरकारच्या सूचनेनुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेण्यासाठी आता मोहीम आखली आहे.
या मोहिमेमध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकास त्याच्या रास्त भाव दुकानात तलाठी किंवा शासकीय कर्मचारी यांच्यामार्फत एक नमुना अर्ज देण्यात येईल. तो अर्ज भरून त्यासोबत वाहन परवाना, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, टेलिफोन बील, वीज बील, मालमत्ता मालकी पुरावा, भाडेकरार, बँक पासबुक यापैकी एक रहिवासी पुरावा जोडायचा आहे. त्यानंतर त्या अर्जांची पोच शिधापत्रिकाधारकास देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
Comments