अकोले । वीरभूमी- 03-Feb, 2021, 12:00 AM
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाच्या राष्ट्रीय मंत्रीपदी महाराष्ट्रातून एकमेव अकोलेचे माजी आमदार वैभवराव मधुकरराव पिचड यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीमुळे त्यांना प्रथमच राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. या निवडीचे पत्र अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. समीर उरांव यांनी दिले.
राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांचे आदिवासी समाजासाठी असलेल्या योगदानाचा व अनुभवाचा फायदा या निमित्ताने होणार असल्याचे मत माजी आमदार वैभवराव पिचड यांनी व्यक्त केले. तसेच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी व राज्य नेतृत्वाने माझयावर विश्वास दाखवून देश पातळीवर काम करण्याची मोठी संधी दिली. त्यांनी घेतलेली दखल ही निश्चितच आदिवासी समाजासाठी अजून काम करण्यास प्रेरणादायी ठरणार आहे. या संधीचा उपयोग देश पातळीवर काम करताना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी आमदार वैभवराव पिचड यांनी गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठवून सरकारला धारेवर धरले. त्यामध्ये खावटी कर्ज, रोजगार, रेशन, नरेगातर्फे रोजगार, आदिवासी संघटन, वीजबिल, ऑनलाईन शिक्षण, कुपोषण, पोषण आहार, वनजमिनी प्रश्न, उपसिंचन योजना, आरक्षण अशा विविध प्रश्नांवर सडेतोड मत व्यक्त करीत अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारला भाग पाडले. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली. लवकरच राष्ट्रीय व राज्य पातळीवर सर्व अनुसूचित जमातीचा एकत्र मेळावा घेऊन कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे श्री. पिचड म्हणाले.
माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री मधुकरराव पिचड, आ.राधाकृष्ण विखे पाटील, आ.मोनिकताई राजळे, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांचेसह जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन सिताराम पा.गायकर, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, जिल्हा सरचिटणीस जालिंदर वाकचौरे, जि. प. सदस्य तथा अर्थ व बांधकाम समितीचे माजी अध्यक्ष कैलासराव वाकचौरे, भाजप महिला जिल्हाध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी, भाजप तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, तालुका सचिव यशवंतराव आभाळे, भाऊसाहेब वाकचौरे, महिला तालुकाध्यक्ष शारदाताई गायकर, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सचिन शेटे, अकोलेचे माजी नगराध्यक्ष अॅॅड. के. डी. धुमाळ, भाजपचे जेष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ, अॅड. वसंतराव मनकर, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे,
नगरसेवक परशुराम शेळके, प्रकाश नाईकवाडी, सभापती सौ. उर्मिला राऊत, उपसभापती दत्तात्रय देशमुख, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे लकी जाधव, आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे अध्यक्ष भरत घाणे, सचिव मंगलदास भवारी, माधवराव गभाले गुरुजी, राजूरचे सरपंच गणपतराव देशमुख, उपसरपंच गोकुळ कानकाटे, सी. बी. भांगरे आदींसह तालुक्यातील कार्यकर्ते व आदिवासी समाजाने पिचड यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.
wFpLrfYeBUglx