अहमदनगर । वीरभूमी- 11-Feb, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत आज अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या. मात्र बँक निवडणुक 4 जागांमुळे बिनविरोध होऊ शकली नाही. यामुळे जिल्हा बँकेतील सहमती एक्सप्रेसला 4 जागांनी ब्रेक लावला आहे तर बँकेच्या तब्बल 17 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.
जिल्हा बँकेसाठी आज उमेदवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस होता. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मोठ्या राजकीय हालचाली होऊन बँकेच्या तब्बल 17 जागा बिनविरोध झाल्या. मात्र 4 जागा बिनविरोध करण्यात सहमती एक्सप्रेसला ब्रेक लागला. यामुळे जिल्हा बँकेसाठी आता सेवा सोसायटी मतदार संघातील नगर, पारनेर, कर्जत आणि बिगर शेती मतदार संघ अशा 4 जागांसाठी दि. 20 फेब्रुवारीला मतदान होत आहे.
बिनविरोध निवड झालेल्या जागा पुढील प्रमाणे-
सेवा सोसायटी मतदार संघ- नेवासा- शंकरराव गडाख, अकोले- सीताराम गायकर, कोपरगाव- विवेक कोल्हे, जामखेड- अमोल राळेभात, शेवगाव- चंद्रशेखर घुले, पाथर्डी- मोनिका राजळे, राहाता- अण्णासाहेब म्हस्के, राहुरी- अरुण तनपुरे, श्रीगोंदा- राहुल जगताप, श्रीरामपूर- भानुदास मुरकुटे, संगमनेर- माधवराव कानवडे.
अनुसुचित जाती मतदारसंघ- अमीत भांगरे, इतर मागासवर्ग मतदारसंघ- करण ससाणे, विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघ- गणपतराव सांगळे, शेती पुरक प्रक्रीया मतदारसंघ- आशुतोष काळे, महिला प्रतिनिधी मतदारसंघ- अनुराधा नागवडे, आशा तापकीर असे 17 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, माजी आ. वैभव पिचड, माजी आ. पांडुरंग अभंग या दिग्गजासह अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
dmENwVeifS