हसन मुश्रीफांचं विरोधकांना आव्हान
कोल्हापूर - 26-Feb, 2021, 12:00 AM
फेब्रुवारी महिना सुरू झाला आणि पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले. कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेऊन राज्य सरकारने प्रशासनाला खबदारी घेण्याच्या सुचना दिल्या. यामुळे राज्यातील अनेक भागात मास्क वापरणे सक्ती, गर्दीवर नियंत्रण, रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
मात्र विरोधी पक्षांकडून ‘हे सरकार अधिवेशनापासून पळ काढण्याचं निमित्त शोधतंय. त्यामुळे अधिवेशन तोंडावर असताना यांनी कोरोनाची हूल उठवली. तसंच ऐन अधिवेशनाच्या तोंडावर संजय राठोड प्रकरण बाहेर आल्याने विरोधक याच प्रश्नावर अधिवेशनात कोंडी करतील, हे सत्ताधार्यांना माहितीय, असा आरोप विरोधकांनी केला.
यावर अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री एका वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले की, अधिवेशन आलं की कोरोना होतो, हा विरोधी पक्षाचा आरोप चुकीचा आहे. त्यांना जर एवढंच वाटतंय तर त्यांनी कोरोनाबाधित मंत्र्यांच्या संपर्कात यावं.
असे म्हणत विरोधकांनी कोरोनावरुन राजकारण करणं थांबवावं, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
dQnyfvlMq