या तारेखनंतर पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार
नवी दिल्ली- 15-Mar, 2021, 12:00 AM
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे आतापर्यंत सात हप्ते शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा झाले असून आठवा हप्ता 10 एप्रिल नंतर शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.
केंद्र सरकार शेतकर्यांच्या खात्यात आठव्या हप्त्याची रक्कम 10 एप्रिलाच्या सुमारास पाठवण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. पीएम-किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकर्यांना आतापर्यंत सात हप्त्यांमध्ये 14 हजार रुपये मिळाले आहेत. आठव्या हप्त्यात शेतकर्यांच्या खात्यात दोन हजार रुपये पाठवले जाणार आहेत. किसान सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरातील 11.66 कोटी शेतकर्यांना 1.15 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. शेतकर्यांनी त्यांच्या रेकॉर्डमध्ये अडचण असल्यास दुरुस्ती करणं आवश्यक आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत आर्थिक वर्षामध्ये शेतकर्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा केले जातात. पहिला हप्ता डिसेंबर ते मार्च, दुसरा हप्ता एप्रिल ते जुलै आणि तिसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर या दरम्यान शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा केला जातो.
पीएम किसान सन्मान योजनेसाठी देशातील 11.66 कोटी शेतकर्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी काही शेतकर्यांच्या रेकॉर्डमध्ये अडचणी असल्यामुळे त्यांना मदत मिळत नाही. जर सर्व शेतकर्यांचं रेकॉर्ड दुरुस्त केले तर सर्व नोंदणीकृत शेतकर्यांना आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळू शकतात.
केंद्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत 11.66 कोटी शेतकर्यांच्या खात्यात पैसे पाठवले आहेत. शेतकर्यांना या योजनेनुसार 1.15 लाख कोटी रुपये शेतकर्यांच्या खात्यात पाठवले आहेत. आठव्या हप्त्याची रक्कम मिळण्यापूर्वी शेतकर्यांना त्यांच्या रेकॉर्डमध्ये काही दुरुस्ती असेल तर करुन घ्यावी लागणार आहे.
Comments