पिचडांना धक्का देत सीताराम गायकर राष्ट्रवादीत; मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश
अकोले । वीरभूमी - 15-Mar, 2021, 12:00 AM
अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांना धक्का देत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सीताराम गायकर यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा मंगळवार दि. 16 रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. याच वेळी अकोले भाजपाचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे समजते.
ऐन अकोले नगर पंचायत निवडणुकीच्या तोंडावर सीताराम गायकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश हा पिचडांना मोठा धक्का मानला जात आहे. आता सीताराम गायकर यांच्यासोबत कोण - कोण प्रवेश करणार, या बाबत अकोले तालुक्यात चर्चेंला उधाण आले आहे.
तालुक्यातील सहकारी संस्थेचे अनेक संचालक प्रवेश करणार आहे. त्यांची अधिकृत नावे समजू शकली नाहीत. मात्र राष्ट्रवादी पक्षात गायकर यांचा प्रवेश झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवसंजिविनी मिळणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बोलल जात आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातुन आलेले गायकर यांनी आपल्या विविध पक्षात मोठा मित्र परीवार जोपासला आहे. तसेच गायकर हे सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवत असतात.
एक उसतोड मुकादम ते कारखान्याचे व्हा.चेअरमन ते जिल्हा बँकेचा चेअरमन हा प्रवास चळवळीतून झालेला आहे. सहकारात असलेला नेता म्हणून अकोले तालुक्यात गायकर यांची ख्याती असुन यामुळे त्यांचा आभ्यासाचा फायदा हा पुुुुढील सहकारी साखर कारखाना, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत, बाजार कमेटी, दुध संंघ या निवडणुकीत होईल. याच कारणांमुळे गायकर यांच्या प्रवेशामुळे बहुजन समाजाचे नेतृत्वाचा अभ्यास व त्यांच्याशी असलेला स्नेह पाहता गायकर हे राष्ट्रवादी पक्षाला फायदेेेशीर ठरणार आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते हा पक्ष प्रवेश होणार आहे. उद्या होणार्या पक्ष प्रवेशात अनेक छोटे-मोठे नेते त्यांच्यासोबत पक्ष प्रवेश करतील, तसेच कोरोनाचा संसर्ग असल्याने हा पक्ष प्रवेश सोहळा मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थित पार पडणार आहे. सीताराम पाटील गायकर हे अजित पवारांचे पहिल्यापासून खंद्दे समर्थक आहे. मात्र झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर माजी मंत्री मधुकरराव पिचडांच्या सोबत नाईजास्तव भारतीय जनता पार्टी या पक्षात त्यांना प्रवेश करावा लागला.
गायकर हे भाजपात गेल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून तर जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेपर्यंत गायकर हे अजित पवारांच्या सतत संपर्कात होते. त्यातच उद्याच्या पक्ष प्रवेशात काँग्रेस,शिवसेना, भाजपाचे काही नेते प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
DzLUigqK