अहमदनगर । वीरभूमी - 15-Mar, 2021, 12:00 AM
अहमदनगर: जिल्ह्यात आज २३५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७७ हजार २६५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.४० टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५५९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २५४६ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २९८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २४१ आणि अँटीजेन चाचणीत २० रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४३, अकोले १६, जामखेड २२, कर्जत ०३, कोपरगाव ३७, नगर ग्रामीण ०८, नेवासा ०५, पारनेर ०९, पाथर्डी ०३, राहाता ०२, राहुरी ०२, संगमनेर १८, शेवगाव १२, श्रीरामपूर १०, कॅन्टोन्मेंट ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७४, अकोले ११, जामखेड ०२, कोपरगाव १३, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०९, पारनेर ०६, पाथर्डी ०५, राहाता ३४, राहुरी १२, संगमनेर ३७, शेवगाव ०९, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर १३ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज २० जण बाधित आढळुन आले. मनपा १२, नेवासा ०१, राहाता ०३, श्रीरामपूर ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ५८, अकोले ०१, जामखेड ०६, कर्जत १६, कोपरगाव २१, नगर ग्रामीण ०८, नेवासा १३, पारनेर १६, पाथर्डी १२, राहाता ३०, राहुरी ०७, संगमनेर २७, शेवगाव ०५, श्रीगोंदा ०१ श्रीरामपूर ०१, कॅन्टोन्मेंट ०७ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:७७२६५
उपचार सुरू असलेले रूग्ण:२५४६
मृत्यू:११७७
एकूण रूग्ण संख्या:८०९८८
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
Comments