मार्च सत्रातील जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर
नवी दिल्ली - 24-Mar, 2021, 12:00 AM
अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा समजली जाणार्या जेईई मेन परीक्षा मार्च सत्राचा निकाल जाहीर झाला आहे. जेईई मेन परीक्षेच्या दुसर्या सत्राचा निकाल अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in वर जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थी या वेबसाईटला भेट देऊन त्यांचा निकाल तपासू शकतात.
विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल तपासण्यासाठी अर्ज क्रमांक आणि जन्मतारखेच्या सहाय्याने लॉग इन करावे लागेल. आता फक्त पेपर 1 चा निकाल जाहीर झाला आहे. दुसर्या सत्राच्या पेपर 1 साठी 6,19,638 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एनटीएच्या म्हणण्यानुसार या सत्रात 13 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत.
मंगळवारी जेईई मेन मार्च परीक्षेची अंतिम उत्तर पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली होती.
असा चेक करा निकाल
स्टेप 1: विद्यार्थ्यांनी निकाल तपासण्यासाठी jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जावे.
स्टेप 2: वेबसाईटवर दिलेल्या जेईई मेन मार्चच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: आता नोंदणी क्रमांक आणि जन्मतारखेच्या मदतीने लॉग इन करा.
स्टेप 4: आपला निकाल स्क्रिनवर दिसून येईल.
स्टेप 5: निकाल तपासा आणि त्याची प्रिंट घ्या.
GSwiKAeNRBOQTpC