अहमदनगर । वीरभूमी - 26-Mar, 2021, 12:00 AM
काल गुरुवारच्या तुलनेत आज शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र शुक्रवारी दुपारी 1 वाजेपर्यंत आझळलेल्या कोरोना बाधितांचा आकडा हा 829 असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
दिवसेंदिवस वाढणार्या कोरोना बाधितांच्या संख्येने चिंता व्यक्त केली जात आहे. नगर शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. सर्वाधिक रुग्ण संख्या नगर शहरात 239 आढळली असून सर्वात कमी संख्या शेवगाव 2 अशी आहे. पाथर्डी तालुक्यात 29 ही गुरुवारची संख्या आजही कायम राहीली.
आज शुक्रवारी दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 205, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 404 आणि अँटीजेन चाचणीत 220 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 90, कोपरगाव 68, नगर ग्रामीण 5, श्रीरामपूर 04, नेवासा 13, पारनेर 10, राहुरी 02, पाथर्डी 01, अकोले 01, श्रीगोंदा 09, कन्टेंन्मेंट बोर्ड 01, जामखेड 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 124, कोपरगाव 20, राहाता 70, नगर ग्रामीण 41, श्रीरामपूर 40, नेवासा 12, पारनेर 21, संगमनेर 33, कर्जत 02, राहुरी 12, पाथर्डी 04, अकोले 04, इतर जिल्हा 09, श्रीगोंदा 01, कन्टेंन्मेंट बोर्ड 08, जामखेड 02, शेवगाव 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 220 जण बाधित आढळुन आले. मनपा 25, कोपरगाव 01, राहाता 11, नगर ग्रामीण 28, श्रीरामपूर 11, नेवासा 27, पारनेर 17, संगमनेर 04, कर्जत 30, राहुरी 16, पाथर्डी 24, अकोले 22, इतर जिल्हा 02, जामखेड 01, शेवगाव 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
kYLdJlgHBKFM