असा मिळवा घरगुती गॅस सिलेंडर 119 रुपयांना
नवी दिल्ली- 27-Mar, 2021, 12:00 AM
महागाईने प्रत्येकजन आज हातघाईला आहे. मात्र महागाईने त्रस्त असलेल्यांना दिलासा देण्यासाठी पे-टीएम (Paytm) अॅपने एक कॅश बॅक ऑफर आणली आहे.
यामध्ये घरगुती गॅस सिलेंडर खरेदी केल्यानंतर तुम्हाला तब्बल 700 रुपयाचा कॅशबॅक मिळणार आहे. या ऑफरचा फायदा घेऊन 819 रुपयाला मिळणारा घरगुती गॅस सिलेंडर 119 रुपयाला खरेदी करू शकता.
सध्या सर्वत्र महागाईचा आगडोंब उसळला आहे. या महागाईमुळे 2021 मध्ये अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 225 रुपयांनी वाढली आहे. यामुळे दिल्ली मध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 819 रुपयांवर पोहोचली आहे. मात्र पे-टीएमने (Paytm) तुमच्यासाठी एक खास कॅश बॅक ऑफर आणली आहे.
या ऑफरमध्ये तुम्ही पे-टीएमवर (Paytm) तुमचा एलपीजी गॅस सिलेंडर बुक करून 700 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळवू शकता. यामुळे अनुदानित असणारा 819 रुपयांचा गॅस सिलेंडर 119 रुपयांना खरेदी करू शकता.
या कॅशबॅकचा लाभ घेण्यासाठी प्रथम आपल्या फोनमध्ये पेटीएम (Paytm) अॅप नसेल तर डाऊनलोड करुन घ्यावा. त्यानंतर पेटीएम वर जावून ‘शो’ (Show more) वर क्लिक करावे लागेल. आता ‘recharge and pay bills’ वर जावे. त्यानंतर आता ‘बुक सिलेंडर’ पर्याय उघडावा. यामध्ये भारत गॅस, एचपी गॅस किंवा इंडेन ऑप्शनमधून आपला गॅस निवडावा.
त्यानंतर आपला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा तुमचा एलपीजी आयडी तेथे भरा. यानंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय दिसेल. आता देय देण्यापूर्वी ‘FIRSTLPG’ प्रोमो कोड ऑफरवर ठेवून गॅस सिलेंडर खरेदी करा.
ही ऑफर पेटीएम अॅपच्या माध्यमातून प्रथमच एलपीजी गॅस सिलेंडर बुक करणार्या ग्राहकांना 700 रुपयांपर्यंतचा हा कॅशबॅक मिळू शकेल. ही कॅशबॅक ऑफर 31 मार्च 2021 पर्यंतच असणार आहे. म्हणजेच, स्वस्त एलपीजी सिलेंडर खरेदी करण्यासाठी आपल्याकडे फक्त काही दिवस शिल्लक आहेत. बुकिंगच्या 24 तासांच्या आत तुम्हाला कॅशबॅक स्क्रॅच कार्ड मिळेल. हे स्क्रॅच कार्ड 7 दिवसांच्या आत वापरावे लागणार आहे.
अशा पद्धतीने आपण घरगुती गॅस सिलेंडर खरेदीवर 700 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळवून फायदा करून घेऊ शकता.
ypWPNjSAVeF