जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या ऑनलाईन सभेत गोंधळ
अहमदनगर । वीरभूमी- 28-Mar, 2021, 12:00 AM
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या ऑनलाईन सभेत विषय मंजुरीवरून वादंग झाले. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही वादाची परंपरा कायम राखली आहे. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वादावर पडदा पडला.
कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेऊन आज दुपारी 12 वाजता जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. ऑनलाईन सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष राजू राहाणे हे होते.
ऑनलाईन सभा सुरू झाल्यानंतर सभेत मांडण्यात आलेल्या विषय मंजुरीवरून वादंग निर्माण झाले. यावेळी विकास डवखरे, प्रवीण ठुबे यांनी संचालकांना धारेवर धरले. काही विरोधकांनी थेट ऑनलाईन सभेत येऊन संचालक मंडळाला धारेवर धरले.
संचालक सलीमखान पठाण व विद्युलता आढाव यांनी विरोधकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र वादंग मिटता मिटेना. ऐनवेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वादंग मिटले.
ऑनलाईन सभेमध्ये संचालक मंडळाच्या बाजुंच्या सभासदांना बोलण्यास जास्त वेळ दिला जात असून विरोधकांना कमी वेळ दिला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सभेच्या ठिकाणी वादंग झाल्याने गर्दी वाढली. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडाला होता.
Comments