आता शिष्यवृत्ती परीक्षा या दिवशी होणार
पुणे । वीरभूमी- 02-Apr, 2021, 12:00 AM
राज्यातील कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा 23 मे रोजी होणार आहे.
या अगोदर इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परिक्षा ही 24 एप्रिल रोजी होणार होती. मात्र वाढता कोरोना संसर्ग विचारात घेऊन अनेक जिल्ह्यातील शाळा प्रशासनाने 30 एप्रिल पर्यंत बंदचे आदेश दिले आहेत.
यामुळे शिष्यवृत्ती परिक्षाही पुढे ढकलण्यात आली होती. आता ही शिष्यवृत्ती परिक्षा 23 मे रोजी होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने कळविले आहे.
त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज विद्यार्थ्यांना 10 एप्रिलपर्यंत भरता येणार आहेत. परीक्षा पुढे गेल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासासाठी अधिक वेळ उपलब्ध होणार आहे.
शिष्यवृत्ती परिक्षेसाठी https:/www.mscepuppss.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.
Comments