मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज या वेळेला साधणार संवाद
मुंबई । वीरभूमी - 02-Apr, 2021, 12:00 AM
राज्यातील कोरोना बाधितांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढणार्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे राज्यात लॉकडाऊन होणार की नाही, याबाबत जनतेतून संमिश्र प्रतिक्रीया येत आहेत.
त्यातच आज शुक्रवार दि. 2 एप्रिल 2021 रोजी रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत.
यावेळी राज्यात लॉकडाऊन लागणार की नाही याचा फैसला होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील वाढता कोरोना संसर्ग, लसीकरण, आरोग्य सुविधा याबाबत आढावा घेणार आहेत.
कोरोना संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार असून कोरोना संदर्भात मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
mbcnujUFQM