अहमदनगर । वीरभूमी - 02-Apr, 2021, 12:00 AM
दिवसेंदिवस जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असून चिंता व्यक्त केली जात आहे. आज शुक्रवारी दुपारी 2 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात जिल्ह्यात तब्बल 1800 कोरोना बाधित आढळून आले.
ही आकडेवारी यावर्षीचा उच्चांक असून वाढता कोरोना बाधितांचा आकडा जिल्ह्याला लॉकडाऊन अथवा कठोर निर्बंधाकडे घेऊन जात आहे.
दिवसेंदिवस वाढणार्या कोरोना बाधितांच्या संख्येने चिंता व्यक्त केली जात आहे. नगर शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
सर्वाधिक रुग्ण संख्या नगर शहरात 456, राहाता 208, पाथर्डी 136, श्रीरामपूर 134, कोपरगाव 110, नगर ग्रामीण 107, राहुरी 87, भिंगार कन्टेंन्मेंट बोर्ड 81, कर्जत 73, नेवासा 72, संगमनेर 71 अकोले 62, पारनेर 51, जामखेड 44, शेवगाव 37, श्रीगोंदा 36, इतर जिल्हा 35 असे एकूण रुग्ण आढळले आहेत.
आज शुक्रवारी दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 434, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 882 आणि अँटीजेन चाचणीत 448 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 186, राहाता 01, पाथर्डी 53, श्रीरामपूर 21, कोपरगाव 23, नगर ग्रामीण 23, राहुरी 10, भिंगार कन्टेंन्मेंट बोर्ड 68, नेवासा 13, अकोले 16, पारनेर 13, जामखेड 01, शेवगाव 01, श्रीगोंदा 04, इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 242, राहाता 138, पाथर्डी 19, श्रीरामपूर 74, कोपरगाव 85, नगर ग्रामीण 62, राहुरी 42, भिंगार कन्टेंन्मेंट बोर्ड 05, कर्जत 07, नेवासा 24, संगमनेर 67 अकोले 20, पारनेर 22, जामखेड 03, शेवगाव 33, श्रीगोंदा 06, इतर जिल्हा 33 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 484 जण बाधित आढळुन आले. मनपा 28, राहाता 69, पाथर्डी 64, श्रीरामपूर 39, कोपरगाव 02, नगर ग्रामीण 22, राहुरी 35, भिंगार कन्टेंन्मेंट बोर्ड 08, कर्जत 66, नेवासा 35, संगमनेर 04 अकोले 26, पारनेर 16, जामखेड 40, शेवगाव 03, श्रीगोंदा 26, इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
Comments